कोरोनाच्या सावटाखाली भारतातील वेगवेगळ्या शहरात इंडियन प्रीमियर लीग २०२१ मधील सामने खेळवले जात आहेत. परंतु पहिल्या तीन आठवड्यातच काही क्रिकेटपटूंनी कोरोनाच्या भितीने अर्ध्यातच आयपीएल वारी सोडली आहे. यात दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याचा समावेश आहे.
एप्रिल २५, रोजी दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. मात्र या विजयानंतर काहीवेळातच अश्विनने या आयपीएल हंगामातून विश्रांती घेत असल्याचे सांगितले होते. आता त्याची पत्नी प्रीति नारायण हिने आपल्या कुटुंबीयांची परिस्थिती सांगितली आहे.
एका आठवड्यातच अश्विन परिवारातील तब्बल १० सदस्य कोरोनाच्या विळख्यात आढळले होते. त्यामुळे प्रीति नारायणने सर्वांना आवाहन करत स्वत:ची काळजी घेण्यास सांगितले आहे.
तिने ट्विट करत लिहिले आहे की, ‘सर्वांना हाय म्हणण्याइतपत चांगले मला वाटत नाहीये. कारण मागील एका आठवड्यातच माझ्या कुटुंबातील ६ प्रौढ आणि ४ मुलांना कोरोनाची बाधी झाली होती. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो एक आठवडा आमच्यासाठी वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला आहे. आता ३ कुटुंबीयांपैकी केवळ एकाचे पालक घरी परतले आहेत.’
https://twitter.com/prithinarayanan/status/1388145447437406211?s=20
कोरोना लसीकरणाचे महत्त्व सांगत प्रीति नारायणने लिहिले की, ‘कोरोनाची लस नक्कीच घ्या. आपली आणि आपल्या कुटुबांची या महामारीपासून सुरक्षा करा.’
https://twitter.com/prithinarayanan/status/1388147885993185280?s=20
‘मानसिकरित्या स्वस्थ होण्याऐवजी शारिरीक रुपात निरोगी होणे अधिक सोपे आहे. माझ्यासाठी पाचवा आणि आठवा दिन सर्वात वाईट गेला. बरेच लोक आम्हाला मदत करण्यास तयार होते. परंतु कोणीही आमच्याजवळ येऊ शकत नव्हते. ही महामारी तुम्हाला पूर्णपणे एकटे पाडते,’ अशा शब्दात तिने आपली व्यथा मांडली आहे.
https://twitter.com/prithinarayanan/status/1388152134818955267?s=20
यापुर्वी अश्विनने ट्विट करत आपण उर्वरित आयपीएल हंगामातून माघार घेत असल्याची माहिती दिली होती. यामागे सध्या भारतात हाहाकार उडवलेल्या कोविड-१९ महामारीचे कारण त्याने दिले होते. त्याने या काळात कुटुंबाला साथ देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते. तसेच सर्व गोष्टी सुरळीत झाल्या तर त्याने परत येऊन खेळण्याची अपेक्षाही व्यक्त केली होती.
I would be taking a break from this years IPL from tomorrow. My family and extended family are putting up a fight against #COVID19 and I want to support them during these tough times. I expect to return to play if things go in the right direction. Thank you @DelhiCapitals 🙏🙏
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) April 25, 2021
अश्विनने ट्विट केले होते की ‘यावर्षीच्या आयपीएलमधून उद्यापासून (२६ एप्रिल) मी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझे कुटुंब आणि विस्तारित कुटुंब कोविड-१९ विरुद्ध लढा देत आहे. आणि मला या कठीण काळात त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. जर गोष्टी योग्य दिशेने गेल्या तर मी खेळायला परत येण्याची अपेक्षा करतो. धन्यवाद.’
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्सच्या आर अश्विनने घेतली आयपीएल २०२१ हंगामातून विश्रांती; ‘हे’ आहे कारण
कोरोनामुळे RRच्या ‘या’ खेळाडूचे आजोबा कालवश, त्यांच्या इच्छापुर्तीसाठी नातवाने घेतला धाडसी निर्णय