जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग अशी ओळख असलेल्या आयपीएलचे वारे पुन्हा एकदा वाहू लागले आहेत. मागच्या वर्षी आयपीएल पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्स फ्रँचायझीने विजेतेपद पटकावले होते. आता आयपीएल 2023 पूर्वी बीसीसीआयने 23 डिसेंबर रोजी लिलाव आयोजित केला आहे. यावर्षीचा लिलावा मागच्या वर्षीच्या तुलनेत लहान आहे. मात्र, यामध्ये अनेक मोठ्या विदेशी खेळाडूंवर बोली लागण्याची शक्यता आहे. रविचंद्रन अश्विन याने स्वतः एका विदेशी दिग्गजाचे नाव सांगितले, जो आयपीएल 2023 च्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो.
रविंचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आहे. त्याची आयपीएल कारकिर्द देखील उत्कृष्ट राहिली आहे. अश्विनने आयपीएलमध्ये आजपर्यंत चेन्नई सुपर किंग्ज, रायजिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मागच्या हंगामात राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएल 2022 पूर्वी दिल्ली कॅफिट्सने अश्विनला रिलीज केले होते आणि मेगा लिलावात रायजस्थान रॉयल्स संघाने त्याला 5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. आगामी हंगाम सुरू होण्यापूर्ही देखील खेळाडूंचा लिलाव होणार असून इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) सर्वात महागडा खेळाडू ठरेल, असे अश्विनला वाटते.
अश्विनच्या मते इंग्लंड क्रिकेट संघाचा हा दिग्गज अष्टपैलू आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सर्वात जास्त महागात विकला जाईल. लखनऊ सुपर जायंट्स संघ त्याला खरेदी करण्यासाठी सर्वात जास्त बोली लावेल, असेही अश्विनने म्हटले. अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “लखनऊ सुपर जायंट्स नक्कीच बेन स्टोक्सवर बोली लावेल. जर त्यांना स्टोक्सला खरेदी करता आले नाही, तर मग ते दुसऱ्या खेळाडूंचा विचार करतील.”
दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सकडे आयपीएल लिलावासाठी एकूण 23.35 कोटी रुपये शिल्लक आहेत. तसेच संघात चार विदेशी खेलाडूंची जागाही शिल्लक आहे. अशात हा संघ स्टोक्ससारख्या मोठ्या खेळाडूसाठी मोठी बोली लावून त्याला ताफ्यात सामील करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. स्टोक्सच्या आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 43 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 25.56च्या सरासरीने आणि 134.56 च्या स्ट्राईक रेटने 920 धावा केल्या आहेत. अश्विनने यावेळी बोलताना वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार निकोलस पुरन (Nicholas Pooran) याच्यावर देखील मोठी बोली लागण्याची शक्यता व्यक्त केली. (R Ashwin’s prediction! Biggest bid for ‘this’ player in IPL 2023 auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ही तर चीटिंग’, पाकिस्तान- इंग्लंड सामन्यातील टीव्ही पंचांच्या ‘त्या’ निर्णयाने वादाला फुटले तोंड
जबाबदारी वाढल्याने जयवर्धनेने सोडले चॅम्पियन संघाचे प्रशिक्षकपद; आता दिसणार या भूमिकेत