एकीकडे मुलगा वडिलाच्या पावलावर पाऊल टाकत एकाच क्षेत्रात काम करतात. तर दुसरीकडे बॉलीवूड अभिनेता आर माधवन याचा मुलगा त्याची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात तो यशस्वीही झाला आहे. माधवनचा मुलगा वेदांत हा स्विमर असल्याने त्याने अनेक स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. अशामध्ये त्याने नुकतेच राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेत अ गटामध्ये राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला आहे.
वेदांतने ओडिसा येथे सुरू असलेल्या ४८व्या राष्ट्रीय ज्युनियर स्विमिंग स्पर्धेच्या १५०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारामध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याचबरोबर त्याने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याने ही स्पर्धा १६: ०१.७३ सेकंदामध्ये पूर्ण केली आहे. यामुळे त्याने २०१७मध्ये अद्वेत पेजने केलेला १६:०६.४३ सेंकदांचा विक्रम मोडीत काढला आहे. या वृत्तेने खूष झालेल्या माधवनने सोशल मीडियावर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेेत.
माधवनने ट्वीट करत म्हटले, ‘कधीही नाही म्हणू नका (नेव्हर से नेव्हर). राष्ट्रीय ज्युनियर १५०० मी फ्रिस्टाईलचा विक्रम मोडीत’, असे कॅप्शन देत वेदांतच्या स्विमिंगचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये वेदांत स्विमिंग करत असून त्याने १६ मिनिटांमध्ये अद्वेतचा ७८०मीटरचा विक्रम मोडल्याचे समालोचकाने म्हटले आहे.
Never say never . 🙏🙏🙏❤️❤️🤗🤗 National Junior Record for 1500m freestyle broken. ❤️❤️🙏🙏@VedaantMadhavan pic.twitter.com/Vx6R2PDfwc
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) July 17, 2022
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेदांतने या स्पर्धेत अनुक्रमे रौप्य पदक जिंकणाऱ्या कर्नाटकच्या अमोघ आनंद व्यकटेश (१६:२१.९८) आणि बंगालच्या शुभजितगुप्ता (१६ ३४.०६) यांचा पराभव केला आहे.
वेदांतने त्याला वेगळी ओळख निर्माण करायची आहे, असे एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. तो म्हणाला, मला माझ्या वडिलांच्या सावलीखाली राहायचे नाही. मला फक्त माझ्या वडिलांच्या नावावरून नाही ओळकले पाहिजे. यासाठी माझ्या बरोबरच माझे आईवडिलही मेहनत घेत आहेत.
कोरोनाच्या काळात मुंबईतील स्विमिंगपूल बंद होते, यामुळे वेदांतला सराव करता येत नव्हता. यासाठी माधवन आणि त्याच्या पत्नीने दुबईला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
वेदांतने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्रासाठी एकूण ७ पदके जिंकली होती. बंगळुरू येथील बसवानगुडी एक्वाटिक सेंटर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत त्याने ४ रौप्य आणि ३ कांस्यपदके जिंकली.
वेदांतने 800 मीटर फ्री स्टाईल जलतरण, 1500 मीटर फ्री स्टाईल जलतरण, 4×100 मी फ्री स्टाईल पोहणे आणि 4×200 मीटर फ्री स्टाईल जलतरण रिले इव्हेंटमध्ये रौप्य पदके जिंकली.
माधवनच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन केले. याशिवाय मुलाच्या चांगल्या संगोपनाबद्दलही माधवनचे कौतुक करण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टोक्सच्या निवृत्तीनंतर विराटने दिली मन जिंकणारी प्रतिक्रिया; म्हणाला,”तू माझ्या करिअरमधील…”
कॉमनवेल्थआधीच भारतीय क्रीडाक्षेत्रात खळबळ! वाचा सविस्तर वृत्त
ICC ODI Ranking | भारताने पराभूत केले इंग्लंडला, पण तोटा झालाय पाकिस्तान संघाचा