बुधवारी (5 फेब्रुवारी) सेडन पार्क (Seddon Park), हॅमिल्टन (Hamilton) येथे 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 4 विकेट्सने (Won By 4 Wickets) पराभूत केले. त्याचबरोबर मालिकेत 1-0ने आघाडीही घेतली.
भारताला पहिला वनडे सामना गमवावा लागल्यानंतर शुक्रवारी (7 फेब्रुवारी) भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर (R Sridhar) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी मान्य केले की, सध्या सुरु असलेल्या वनडे मालिकेत भारताचे क्षेत्ररक्षण (Fielding) चांगले झालेले नाही.
वेळापत्रकाला दोष न देता सततच्या प्रवासामुळे सरावात कमतरता आल्याचे कारणही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच मागील 4 महिन्यांमध्ये भारताचे क्षेत्ररक्षण चांगले झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
क्षेत्ररक्षणाबद्दल सांगताना श्रीधर पुढे म्हणाले, क्षेत्ररक्षणातील खराब कामगिरीचे कारण खेळाडूंना आलेेला थकवा असू शकतो.
“भारतातील विंडीजविरुद्ध टी20 आणि वनडे मालिकेपासून आमचे क्षेत्ररक्षण खराब व्हायला सुरुवात झाली. आमच्याकडून क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी केली जात नाहीये. विश्वचषक किंवा त्यापूर्वीच्या आमच्या कामगिरीच्या तुलनेत ही कामगिरी कुठेच नाही.”
श्रीधर यांनी सांगितले की, संघ व्यवस्थापनाचे लक्ष खेळाडूंच्या सरावाच्या वेळापत्रकावर आणि कामाच्या ताणावर आहे. टी20 सामन्यात प्रत्येक क्षेत्ररक्षक हा स्वत:च कर्णधार असतो. त्या क्षेत्ररक्षकाला कर्णधाराच्या इशाऱ्याची आवश्यकता नसते.
“सध्याच्या वेळापत्रकामुळे असेच होईल. तसेच हे मान्यदेखील करावे लागेल. आम्हाला व्हिडिओ पाहुन आमच्या चूका पहाव्या लागतील. वेळापत्रक हे व्यस्त आहे परंतु, याला कारण सांगता येणार नाही. आम्हाला चांगलीच कामगिरी करावी लागेल,” असे वेळापत्रकाबद्दल बोलताना श्रीधर म्हणाले.
या वनडे मालिकेतील दुसरा सामना ऑकलंड (Auckland) येथे शनिवारी (8 फेब्रुवारी) पार पडणार आहे.
विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ कोण आहे सर्वोत्तम? सचिन तेंडूलकरने दिले ‘हे’ उत्तर
वाचा👉https://t.co/WYrHRZkraG👈#म #मराठी #Cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020
भारताचे टेंशन वाढणार; दुसऱ्या वनडेत करावा लागणार ६ फूट ८ इंचावरुन येणाऱ्या चेंडूचा सामना
वाचा👉https://t.co/JNJwxs3V3p👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020