जवळपास पाच वर्ष भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक राहिलेल्या आर श्रीधर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कोचिंग बियॉंड या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यामध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना आलेल्या अनुभवांचे वर्णन केले आहे. काही धक्कादायक खुलासा नंतर त्यांनी आता भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचे या पुस्तकातून कौतुक केल्याचे दिसत आहे.
रवी शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असताना श्रीधर यांनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका अत्यंत चोख बजावली होती. त्यांच्याच काळात भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगलाच उंचावला. 2021 टी20 विश्वचषकानंतर त्यांना पदमुक्त केले गेलेले. त्यानंतर त्यांनी आपल्या भारतीय संघासोबतच्या प्रवासा वेळेचे काही अनुभव कोचिंग बियॉंड या पुस्तकात लिहिले. त्यात धोनीविषयी ते लिहितात,
“मला वाटते दोन्ही हा खूप मोठा शिक्षक आहे. त्याच्यासारखा कोणीच नाही. तो आपल्या भावना आणि उत्सुकता दाखवत नव्हता. अगदी त्याचवेळी तो अतिशय वेगाने परिस्थिती समजून घेत, त्यावर विचार करत ती अंमलात आणत देखील असत. त्याची ही गोष्ट अनेकांनी शिकण्यासारखी आहे.”
श्रीधर यांच्या या पुस्तकातून यापूर्वी अनेक मोठे खुलासे झाले आहेत. विराट कोहली हा 2016 मध्येच वनडे व टी20 संघाचा कर्णधार होण्यासाठी उत्सुक होता असे त्यांनी लिहिलेले. मात्र, ही गोष्ट धोनीपर्यंत न जाता रवी शास्त्री यांनी विराटला समजावत संपवलेली, असा दावा श्रीधर यांनी केला होता. तर, एकदा रवी शास्त्री यांनी टीम मीटिंगमध्ये थेट धोनीलाच धारेवर धरल्याचे देखील त्यांनी लिहीले. श्रीधर सध्या समालोचक म्हणून काम करत आहेत.
(R Sridhar Wrote MS Dhoni Is Great Teacher In His Book Coaching Beyond)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चाळिशी पार करणारा शोएब मलिक घेणार नाही निवृत्ती; म्हणाला, ‘मी 25 वर्षांच्या खेळाडूपेक्षा जास्त फिट…’
म्हारी छोरियां छोरों से कम हैं के! वर्ल्डकप विजयानंतर भारतीय महिलांचा ‘काला चष्मा’वर धमाल डान्स