---Advertisement---

६ पैकी त्या एका अॅवार्डमुळे कागिसो रबाडा होतोय सोशल मीडियावर ट्रोल!

On: सोमवार, जून 4, 2018 6:06 PM
---Advertisement---

डर्बन | यावर्षी दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात कागिसो रबाडा या तरुण गोलंदाजाने छाप सोडली. तब्बल ६ अॅवार्ड जिंकुन त्याने खास कारनामा केला.

क्रिकेटर ऑफ द इअर,  टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअर, वनडे क्रिकेटर ऑफ द इअर, एसए प्लेयर्स प्लेयर ऑफ द न, फॅन्स प्लेयर ऑफ द इअर, डीलिवरी ऑफ द इअर हे अॅवार्ड त्याला मिळाले. याबरोबर ट्राॅफींबरोबर फोटो देताना मात्र त्याच्याकडून एक चुक झाली.

त्याने ज्या ट्राॅफीबरोबर पोज दिली आहेत त्यातील दोन्ही हातात घेतलेली ट्राॅफी ही महिला क्रिकेटर अाॅफ द इअरची आहे. यामुळे सोशल माध्यमांवर मात्र त्याला चांगलेच ट्राॅल करण्यात आले.

काही चाहत्यांनी तर ‘तो यावर्षी एवढा चांगला खेळला की त्याला महिला क्रिकेटर अाॅफ द इअरचाही अॅवार्ड मिळाला’ अशा कमेंट केल्या आहेत.

https://twitter.com/Gomolemo_17/status/1003174755929874432

https://twitter.com/OfficialDJIzzy/status/1003228336833941504

दक्षिण आफ्रिके क्रिकेटच्या पुरस्कार क्रिकेटर ऑफ द इयर अॅवार्ड जिंकणारा तो केवळ ५वा खेळाडू ठरला आहे.  यापुर्वी केवळ हाशिम अमला, जॅक्स कॅलिस, मखाया एंटिनी आणि एबी डिविलियर्स यांना हा अॅवार्ड मिळाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment