जपानचे फिफा विश्वचषकातील अचूक स्थान सांगणाऱ्या रॅबिओट या ऑक्टोपसचे तुकडे करून सी-फूड मार्केटमध्ये विकण्यात आले.
हा ऑक्टोपस होकाईडो इथे सापडला होता. जपानचा पोलंड, कोलंबिया आणि सेनेगल विरूद्धच्या सामन्याचा त्याने बरोबर अंदाज लावला होता. त्याच्या या गुणामुळे त्याला ‘सायकिक’ असेही संबोधले जाई.
त्याच्या मालकाने व्यवसाय चालू ठेवण्यासाठी त्याने या ऑक्टोपसचे तुकडे केले.
बाद फेरीचा अंदाज लावण्याचे भाग्य त्याला लाभले नाही. कारण त्यावेळी त्याचे तुकडे करण्यात आले होते. त्याच्या तुकड्यांचे फोटोज सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
https://twitter.com/SEXhsKF7/status/1012533302333300737
मिळालेल्या माहितीनुसार त्या ऑक्टोपसमध्ये असलेल्या काही खास गुणांमुळे तो खूप प्रसिद्ध झाला होता. जपानचे फिफामधील भविष्य सांगण्यासाठी त्याला गरज असलेल्या प्लॅस्टिकच्या बाथटबचे तीन भाग करण्यात येई.
त्यातील एक भाग जपान संघाच्या विजयासाठी, दुसरा विरूद्ध संघाच्या विजयासाठी आणि तिसरा अनिर्णीत निकालासाठी असायचा. मग या तीनमधील ज्या बाथटबमध्ये तो पोहेल तोच निकाल ग्राह्य धरला जायचा.
महत्त्वाच्या बातम्या-
–वडिलांचे अपहरण झालेले असतानाही तो मैदानावर देशासाठी लढला
–पांढरी दाढी ठेवून खेळणार पुढचा फिफा विश्वचषक- सर्जियो रॅमोस