भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतरत्न श्री अलट बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेदरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्यात एका मोठ्या विक्रमासाठी स्पर्धा पाहायला मिळू शकते.
बुमराह-चहलमध्ये शर्यत
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताचे प्रमुख गोलंदाज असलेल्या बुमराह आणि चहल या दोघांनाही अंतिम ११ जणांमध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज होण्यासाठी त्यांच्यात चढाओढ पाहायला मिळू शकते. सध्या या यादीत दोघेही संयुक्तरित्या अव्वल स्थानी आहेत.
या मालिकेतून बुमराह भारतीय संघात पुनरागमन देखील करणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये बुमराहने ५५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ६६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच युजवेंद्र चहलने ५२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ६६ विकेट्स घेतल्या आहेत. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ६१ विकेट्ससह आर अश्विन आहे (Most T20I Wickets for India).
त्यामुळे आता चहल आणि बुमराह या दोघांमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी२०मध्ये जो जास्त विकेट्स घेईल, तो भारताकडून सर्वाधिक टी२० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. याशिवाय या दोघांनाही एकमेकांना मागे टाकण्याबरोबरच अजंता मेंडिस, मिशेल सँटेनर आणि नुवान कुलशेखरा या तीन गोलंदाजांनाही पछाडण्याची संधी आहे. या तिघांनीही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ६६ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० विकेट्स घेणाऱ्या जगातील एकूण गोलंदाजांमध्ये हे ५ गोलंदाज सध्या संयुक्तरित्या १७ व्या क्रमांकावर आहेत.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० विकेट्स घेणाऱ्या जगातील एकूण गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन आहे. त्याने ११७ विकेट्स घेतल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज (१९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत)
६६ विकेट्स – जसप्रीत बुमराह (५५ सामने)
६६ विकेट्स – युजवेंद्र चहल (५२ सामने)
६१ विकेट्स – आर अश्विन (५१ सामने)
५५ विकेट्स – भुवनेश्वर कुमार (५७ सामने)
४६ विकेट्स – रविंद्र जडेजा (५५ सामने)
महत्त्वाच्या बातम्या –
संजू सॅमसनची टी-२० विश्वचषकासाठी निवड निश्चित? कर्णधार रोहित शर्मा काय म्हणतोय पाहा
रश्मिका मंदानासोबता रोमान्स करताना दिसला डेविड वॉर्नर, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी२० पूर्वी सुनील गावसकरांना मोठा मान; विशेष घटनेनंतर होणार सामना सुरू