ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. सध्या ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि डेविड वॉर्नरही संघासोबत आहेत. संघासोबत वॉर्नर आगामी मालिकासाठी जोरदार सराव करत आहे. असे असले तरी, तो सोशल मीडिया पोस्ट टाकायला अजिबात विसरला नाही. त्याने यापूर्वी दाक्षिणात्य अभिनेता अलु अर्जुनच्या ‘पुष्षा द राइज’ या चित्रपाटावर अधारीत व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आता पुन्हा एकदा वॉर्नरने याच चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला आहे.
डेविड वॉर्नर नेहमीच भारतीय चित्रपट आणि गाण्यांवर व्हिडिओ आणि रिल तयार करतो आणि चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असतो. परंतु पुष्पा चित्रपटावर त्याने एक नाही, तर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. विशेष म्हणजे वॉर्नरव्यतिरिक्त जागतिक क्रिकेटमधील अनेक क्रिकेटपटूंनी देखील या चित्रपटातील गाणी आणि डायलॅगवर व्हिडिओ शेअर केले आहेत.
बुधवारी वॉर्नरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या सोबत अभिनेत्री सश्मिका मंदाना दिसत आहे. या व्हिडिओत अलु अर्जुनच्या चेहऱ्याच्या जागेवर डेविड वॉर्नरचा चेहरा बसवला गेला आहे. वॉर्नर आणि रश्मिका यांच्यातील रोमान्स व्हिडिओत दाखवला गेला आहे. चाहत्यांकडून व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळत आहेत.
https://www.instagram.com/tv/CaUZ23Yp24c/?utm_source=ig_web_copy_link
व्हिडिओ शेअर केल्यानंतर खूपच थोड्या वेळात तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ३० लाखांपेक्षा अधिक चाहत्यांकडून पाहिले गेले आहेत, तर जवळपास ८ लाखांहून अधिक चाहत्यांनी त्याला लाइक्स दिल्या आहेत. डेविड वॉर्नरचे ऑस्ट्रेलियात जेवढे चाहते आहेत, तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त चाहते भारतातही आहेत. त्याच पाश्वभूमीवर तो भारतीय चाहत्यांना आवडेल अशा पोस्ट शेअर करत असोत. त्याव्यतिरिक्त तो त्याच्या मुलींसोबतचे व्हिडिओही नेहमी शेअर करत असतो.
आयपीएलच्या मागच्या हंगामापर्यंत तो सनरायझर्स हैदराबातचा भाग होता. पण मागच्या वर्षी हंगामाच्या मध्यात त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले गेले आणि नंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर ठेवले गेले होते. दरम्यान, तो आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात सहभागी झाला होता. त्यामुळे या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला ६ कोटीपेक्षा जास्त बोली लावून संघात सामील केले आहे. यापूर्वी वॉर्नरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात दिल्ली संघासोबतच केली होती.
पाकिस्तान दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला तीन सामन्यांची कसोटी, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि एकमात्र टी-२० सामना खेळायचा आहे. या सामन्यांमध्ये वॉर्नर खेळताना दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही
‘सुट्टी तेव्हाच घेईल, जेव्हा…’, म्हणत रोहित शर्माने दिले बायो-बबलच्या प्रश्नावर स्पष्ट उत्तर






