ऑस्ट्रेलियाची स्टार फलंदाज आणि महिला संघाची उपकर्णधार रचेल हेनस हिने गुरुवारी (15 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 35 वर्षीय हेनसने तत्काळ प्रभावाने हा निर्णय घेतला आहे. यानंतर ती देशांतर्गत क्रिकेट स्पर्धाही खेळणार नसल्याचे तिने सांगितले आहे. ती आगामी बिग बॅश लीग 8 मध्ये सिडनी थंडर संघाकडून शेवटची क्रिकेट खेळताना दिसेल.
5 वेळची विश्वचषक विजेती हेनसने (Rachael Haynes) 167 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान तिने 3818 धावा बनवल्या आहेत. हेनसने तिच्या निवृत्तीबद्दल माहिती देताना म्हटले की, ‘तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याशिवाय या स्तरावर खेळणे अशक्य होते. तसेच माझे राज्य, क्रिकेट क्लब, कुटुंबिय आणि मित्रांचे आभार व्यक्त करते. मी त्या सर्वांची आभारी आहे, ज्यांनी मला या प्रवासात साथ दिली. मी माझ्या आई, वडिलांना धन्यवाद म्हणून इच्छिते. तसेच माझ्या जीवनसाथीचेही आभार मानते.’
https://twitter.com/AusWomenCricket/status/1570171056815738880?s=20&t=477U7mGmbkD7eWxBgf0nzg
https://twitter.com/cricketcomau/status/1570223149509386240?s=20&t=85F_CAgpJVIIRgXKvZ7GPw
5 वेळा जिंकलाय विश्वचषक
हेनसने 2013 आणि 2022 साली वनडे विश्वचषक खेळले होते आणि ऑस्ट्रेलियाचा चषक जिंकून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. याबरोबरच ती ऑस्ट्रेलियाच्या 3 टी20 विश्वचषक विजयांचाही भाग होती. 2012, 2018 आणि 2020 सालच्या टी20 विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघांचा ती भाग राहिली होती. याबरोबरच ती कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या सुवर्णपदक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाकडूनही खेळली आहे.
तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास, तिने 84 टी20 सामने खेळताना 850 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने 3 अर्धशतकेही केली आहेत. वनडे क्रिकेटमध्ये 77 सामने खेळताना 2585 धावा तिने फटकावल्या आहेत. यादरम्यान तिच्या बॅटमधून 2 शतके निघाली आहेत. तसेच 19 अर्धशतकांचाही यात समावेश आहे. तिची कसोटी कारकिर्द मात्र छोटी राहिली आहे. तिने 6 कसोटी सामन्यात 3 अर्धशतकांच्या मदतीने 383 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजाचा ‘रिकव्हरी फेज’ सुरू, उभा राहण्यासाठीही घ्याला लागतोय काठीचा आधार
अंपायर रौफ यांच्यावर ओढावली होती चपला विकण्याची वेळ, आता अचानक घेतला जगाचा निरोप
शाहिद आफ्रिदीचे खळबळजनक वक्तव्य! म्हटला, विराटसाठी हीच योग्य वेळ आहे त्याने…