बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी (4 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघ समोरासमोर आले आहेत. शनिवारच्या डबल हेडरमधील या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. मात्र न्यूझीलंडचा युवा सलामीवीर रचिन रवींद्र याने न्यूझीलंडच्या फलंदाजी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आपला पहिलाच विश्वचषक खेळत असलेल्या रचिन याने स्पर्धेतील आपले तिसरे शतक पूर्ण केले.
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर न्यूझीलंड संघासाठी डेवॉन कॉनवे व रचिन रवींद्र यांनी चांगली सलामी दिली. कॉनवे बाद झाल्यानंतर कर्णधार केन विलियम्सन याला सोबत घेत रचिन याने पाकिस्तानी गोलंदाजांवर आक्रमण केले. स्पर्धेतील आपला शानदार फॉर्म कायम राखत त्याने 51 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. त्यानंतरही न थांबता त्याने शतकाच्या दिशेने मार्गक्रमण केले.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1720709167294582799?t=aHYKNBF9DJayvjv4GimKcA&s=19
त्याने 88 चेंडूंमध्ये या विश्वचषकातील आपले तिसरे शतक झळकावले. त्याने यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतके पूर्ण केली होती. यासोबतच त्याने स्पर्धेत पाचशे धावांचा टप्पा देखील पूर्ण केला. बात होण्यापूर्वी त्याने 94 चेंडूंमध्ये 108 धावांची खेळी केली. यामध्ये पंधरा चौकार व एका षटकारांचा समावेश होता.
रचिन याचे हे एकप्रकारे घरचे मैदान म्हणता येईल. त्याचे कुटुंबीय बेंगलोर येथीलच रहिवासी असून त्याचे वडील न्यूझीलंडमध्ये स्थायिक झालेले आहेत. तो अनेक वेळा सरावासाठी बेंगलोरमध्ये देखील येत असतो.
(Rachin Ravindra Hits 3rd Century In ODI World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
भारत-श्रीलंका सामन्यात फिक्सिंग? बोर्डाने उचलले गंभीर पाऊल, वाचा सविस्तर
BIG BREAKING: टीम इंडियाचा हुकमी एक्का वर्ल्डकपमधून बाहेर, ‘या’ खेळाडूची संघात एंट्री






