---Advertisement---

BIG BREAKING: टीम इंडियाचा हुकमी एक्का वर्ल्डकपमधून बाहेर, ‘या’ खेळाडूची संघात एंट्री

---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा आता आपल्याकडे चालल आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत आपली जागा बनवली असून, त्यांना पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. असे असतानाच आता संघासाठी एक धक्कादायक बातमी येत असून, उपकर्णधार व प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या हा दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा संघात सामील होईल.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1720645071056556301?t=2v3BERui2gDluY4Q1TbNxw&s=19

हार्दिक या विश्वचषकातील बांगलादेश विरुद्धच्या चौथ्या सामन्यात आपले पहिले षटक टाकतानाच दुखापतग्रस्त झाला होता. त्या पायाच्या दुखापतीमुळे तो पुढील दोन सामने खेळणार नसल्याचे आधी सांगण्यात आले होते. त्यानंतर तो थेट उपांत्य फेरीसाठी उपलब्ध होईल असे म्हटले गेले. मात्र, आता तो उर्वरित विश्वचषकात खेळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हार्दिक संघातून बाहेर झाल्यामुळे युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला संधी देण्यात आली. कृष्णा याने आशिया चषकात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पाच नियमित गोलंदाज खेळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

(Hardik Pandya ruled out of the World Cup 2023 Prasidh Krishna replaces Him)

महत्वाच्या बातम्या – 
पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर 22 यार्डस संघ विजयी
ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीजमध्ये देशतून 200हून अधिक खेळाडू सहभागी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---