---Advertisement---

रचिनचा रंग कायम! ऑस्ट्रेलियन गोलंदाजी फोडत ठोकले दुसरे वर्ल्डकप शतक

On: शनिवार, ऑक्टोबर 28, 2023 5:28 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (28 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 388 धावा उभ्या केल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलडचा युवा अष्टपैलू रचिन रवींद्र याने शानदार शतक त्याचे हे विश्वचषकातील दुसरे शतक ठरले.

आपला पहिलाच विश्वचषक खेळत असलेल्या अवघ्या 23 वर्षाच्या रचिनने या स्पर्धेत आपली छाप सोडणे सुरूच ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इतर अनुभवी फलंदाज बाद होत असताना त्याने सुंदर फलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने विश्वचषकातील आपले दुसरे शतक पूर्ण करण्यासाठी केवळ 77 चेंडू घेतले. यामध्ये सात चौकार व पाच षटकारांचा समावेश होता. बाद होण्यापूर्वी त्याने 89 चेंडूंमध्ये 116 धावांची खेळी केली.

रचिन याने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध नाबाद 123 धावांची खेळी केली होती. त्यानंतर नेदरलँड्स विरुद्ध देखील त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलेले. भारताविरुद्धच्या मागील सामन्यात देखील त्याने 75 धावांची शानदार खेळी साकारलेली. सध्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

(Rachin Ravindra Hits His Second Century In ODI World Cup 2023 Against Australia)

हेही वाचा-
मॅक्सवेलने मारला World Cup 2023चा सर्वात लांब षटकार, तुटला ‘या’ भारतीयाचा रेकॉर्ड, पाहा अफलातून व्हिडिओ
ट्रेविस हेडने रचला मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला चौथा खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---