बर्मिंघम येथे आजपासून (२८ जुलै) कॉमनवेल्थच्या थराराला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश केला जात आहे. तर तब्बल २४ वर्षानंतर क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे असे मानले जात आहे. मात्र राधा यादवने म्हटले टी२०मध्ये सगळेच संघ उत्तम कामगिरी करत आहेत. तसेच तिचे या स्पर्धेतून लहानपणीचे स्वप्नही पूर्ण होत आहे.
भारताची फिरकीपटू राधा यादव (Radha Yadav) ही लहानपणी कॉमनवेल्थ गेम्ससारख्या बहु-खेळ स्पर्धा टीव्हीवर भरपूर पाहत होती. या स्पर्धेत तिचा भारतीय संघात समावेश असून तिला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले, तर एकदंरीत तिचे लहानपणीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. महिला क्रिकेटचे या स्पर्धेत पदार्पण होत आहे. यातील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात खेळला जाणार आहे.
या स्पर्धेतील क्रिकेटचे सर्व सामने एजबस्टन येथे खेळले जाणार आहेत. भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला असून त्यांनी सरावाला सुरूवात देखील केली आहे. राधाने सरावानंतर म्हटले, “लहानपणापासून कॉमनवेल्थ गेम्स टीव्हीवर पाहत आहे. यामध्ये खेळणे ही एक सन्मानजनक बाब आहे. विशेष म्हणजे ऑलिम्पिकमध्ये जेव्हा राष्ट्रगीत होते तेव्हा मनस्वी आनंद होतो.”
ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सामन्याबाबत राधाने म्हटले, “टी२०मध्ये सगळ्या संघांची कामगिरी उत्तम आहे. तुम्ही असे नाही म्हणू शकत की एका प्रकारामध्ये केवळ एकच संघ उत्कृष्ठ आहे.” हा सामना झाल्यानंतर भारत ३१ जुलैला पाकिस्तानशी भिडणार आहे.
मुंबईत जन्मलेल्या राधाने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत १ वनडे आणि ४३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. २२ वर्षाच्या या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ६.५३च्या इकोनॉमी रेटने ५६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी२० विश्वचषकात साखळी फेरीत भारताने ७ विकेट्सने सामना जिंकला होता. तेव्हा राधाला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून निवडले होते. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात २३ धावा देत ४ विकेट्स ही तिची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शुभमनचं शतक हुकलं! पण पठ्ठ्यानं थेटं केली सचिन अन् सेहवागची बरोबरी, पाहा काय आहे विक्रम
जबरस्त सिक्स अन् मोईनचा पराक्रम! ठोकली टी२०मध्ये दुसरी सर्वात जलद फिफ्टी, युवी अजूनही ‘नंबर १’