Excellent catch by Radha Yadav: भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. दरम्यान इंग्लंड महिला क्रिकेट संघाने एजबेस्टन येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या टी20 सामन्यात भारतीय संघाला 5 विकेट्सने पराभूत केले. मात्र, भारताने मालिका आधीच आपल्या नावावर केली होती. पाचव्या टी20 मध्ये राधा यादवने (Radha Yadav) हवेत झेप घेत एक अवघड झेल पकडला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Radha Yadav catch video viral)
भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 167 धावा केल्या होत्या. शेफाली वर्माने 41 चेंडूत 75 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत तिने 13 चौकारांसह 1 षटकार मारला. तर रिचा घोषने शेवटी 16 चेंडूत 24 धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी केली.
इंग्लंड संघ लक्ष्य गाठताना अंतिम षटकापर्यंत पोहोचला होता आणि इंग्लंडचे पारडे जड होते. 4 चेंडूत फक्त ५ धावांची गरज होती. दरम्यान अरुंधती रेड्डीच्या चेंडूवर एमी जोन्सने हवेत शॉट मारला. राधा यादव चेंडूजवळ धावली, पण चेंडू तिच्यापासून थोडा दूर पडत होता. राधा यादवची नजर चेंडूवरून हटली नाही; पुढे धावताना तिला जाणवले की ती चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही, तेव्हा तिने हवेत उडी मारली. तिने हवेत चेंडू पकडला आणि खाली पडतानाही तो निसटू दिला नाही.
WHAT A CATCH BY RADHA YADAV ????
— Johns. (@CricCrazyJohns) July 13, 2025
– One of the best fielders in World Cricket Currently, Radha. pic.twitter.com/YgkfeBZvEK
या झेलने भारतीय संघाच्या डगआऊटमध्ये विजयाच्या आशा वाढवल्या होत्या, मात्र अंतिम चेंडूवर इंग्लंडने लक्ष्य गाठत 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. इंग्लंडसाठी 3 विकेट्स घेणारी चार्ली डीन ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरली. भारतीय खेळाडू नल्लापुरेड्डी चरणी हिला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. (Nallapureddy Charani Player of the Series)
भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्याचा इतिहास रचला आहे. (T20 Series win) भारतीय संघाने पहिला आणि दुसरा टी-20 सामना जिंकला होता, तिसरा सामना यजमानांनी जिंकला होता. चौथा सामना जिंकून भारताने मालिकेत आधीच विजयी आघाडी घेतली होती. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये 6 टी-20 मालिका झाल्या होत्या, ज्यात भारताला कधीही विजय मिळवता आला नव्हता. दरम्यान ही मालिका जिंकून भारतीय महिला संघाने इतिहास रचला. (Women’s Cricket History)






टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा