राधा यादव (Radha Yadav) ही भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून गणली जाते. रविवारी (27 ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यातही तिचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. तीने ब्रूक हॅलिडेचा झेल हवेत झेपावत घेतला. राधाचा हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.
ही घटना न्यूझीलंडच्या फलंदाजीच्या 32 व्या षटकात घडली. भारताच्या वतीने प्रिया मिश्रा गोलंदाजी करत होती. प्रियाने या षटकातील तिसरा चेंडू ऑफ स्टंपवर टाकला. हॅलिडेने पुढे जाऊन मोठा फटका खेळला आणि चेंडू हवेत कव्हरच्या दिशेने गेला. राधा यादवने पाठीमागे धावत असताना तिची नजर चेंडूवर ठेवली. शेवटी हवेत उडत अप्रतिम पद्धतीने झेल पकडला.
या सामन्यात राधा यादवने दोन झेल घेतले. तत्पूर्वी, 16 व्या षटकात तीने संघासाठी धोकादायक ठरत असलेल्या सलामीवीर जॉर्जिया प्लिमरला झेलबाद केले होते. तीने 50 चेंडूत 41 धावा केल्या.
राधा यादवने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासोबतच अप्रतिम गोलंदाजीही केली. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि संपूर्ण षटके खेळल्यानंतर 9 गडी गमावून 259 धावा केल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार सोफी डिव्हाईनने सर्वाधिक धावा केल्या. तीने 86 चेंडूत 79 धावा केल्या. ज्यात सात चौकार आणि एक षटकार होता. तर, भारताकडून राधा यादव ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तीने 10 षटकांच्या स्पेलमध्ये 69 धावा देऊन 4 बळी घेतले.
WHAT A CATCH BY RADHA YADAV 🤯
– Radha, the best in the business for India pic.twitter.com/S0q4HHlHKb
— Johns. (@CricCrazyJohns) October 27, 2024
भारताने पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा 59 धावांनी पराभव केला होता. हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घ्यायची आहे. त्याचबरोबर यजमानांना हरवून न्यूझीलंड मालिकेत स्वतःला कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. ही मालिका तीन सामन्यांची असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ 5 संघांकडून भारत घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा पराभूत!
“गौतम गंभीर लवकरच…” भारताच्या पराभवानंतर माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य!
रोहित शर्मानंतर कोण बनणार भारतीय कसोटी संघाचा कर्णधार? हे 3 खेळाडू शर्यतीत