लाल मातीचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेल नदालने त्याच्या कारकिर्दीतील २२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले आहे. या विजयासह ३५ वर्षीय नदाल सर्वाधिक विजेतेपदांसाठी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडररपासून दोन स्थानांनी पुढे गेला आहे. नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडररने प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
पॅरिसमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नदालने आठव्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा ६-३, ६-३, ६-० असा पराभव केला, आणि चौदाव्यांदा फेंच ओपन स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या सामन्यांत नदालने प्रतिस्पर्धी असणाऱ्या आणि पहिल्यांदाच अंतिम सामना खेळणाऱ्या रुडला अगदी गुडघे टेकायला भाग पाडले. नदालने संपूर्ण सामना एकतर्फी लढतीत जिंकला असून. विजेतेपद पटकवल्यानंतर नदालचे सर्वत्र कौतुक होत आहे.
14 in Paris 🏆
Feels good, no? 🧡#RolandGarros | @RafaelNadal pic.twitter.com/YYzXtuznQT
— Roland-Garros (@rolandgarros) June 5, 2022
दरम्यान, या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नदालचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या झ्वेरेवच्या पायाच्या मांसपेशीत ताण आला. त्याला दुखापतीमुळे कोर्टबाहेर पडावे लागले पण त्याने थोड्या वेळाने कुबड्यांच्या मदतीने पुनरागमन केले. मात्र, असह्य वेदना झाल्याने तो पुढे खेळण्यास असमर्थ दिसला. यामुळे नदाल अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नदालने १४व्यांदा मारली French Openच्या फायनलमध्ये धडक, तरीही का झाला निराश?, कारण खूपच धक्कादायक
इथन लाहोटी, केशव भय्या यांची विजयी सलामी
दुहेरीत स्मित उंद्रे व वरद उंद्रे यांनी पटकावले विजेतेपद