---Advertisement---

एटीपी क्रमवारीत राफेल नदाल पुन्हा अव्वलस्थानी विराजमान

On: सोमवार, एप्रिल 2, 2018 6:32 PM
---Advertisement---

राफेल नदाल हा एटीपी क्रमवारीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये तो दुसऱ्या स्थानावर गेला होता. 

अव्वल क्रमांकावर हा त्याचा 168वा आठवडा असणार आहे. हे करताना स्विझरलंडच्या रॉजर फेडररला त्याने मागे टाकले आहे.

याआधी फेडरर 19 फेब्रुवारीला अव्वल स्थानी आला होता. तो आजपर्यंत 308 आठवडे पहिल्या क्रमांकावर होता. हा जागतिक विक्रम आहे.

नदाल तब्बल साडेनऊ वर्षापुर्वी 18 अॉगस्ट 2008  रोजी पहिल्यांदा या क्रमांकावर विराजमान झाला होता.  31 वर्षीय नदाल 25 एप्रिल 2005 मध्ये 22 वर्षाचा असताना एटीपी क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये आला होता.

या काळात नदाल होता अव्वल स्थानावर विराजमान-

18 अॉगस्ट 2008 ते 5 जुलै 2009- ( 46 आठवडे )

7 जून 2010 ते 3 जुलै 2011- ( 56 आठवडे )

7 ऑक्टोबर 2013 ते 6 जुलै 2014- ( 39 आठवडे )

21 ऑगस्ट 2017 ते 18 फेब्रवारी 2018- ( 26 आठवडे )

 

राॅजर फेडरर ( 308 ), पीट सॅम्प्रस ( 286 ), इवान लेन्डल (270 ), जिमी कोनोर्स ( 268 ), नोवाक जोकोविक ( 223 ) आणि जाॅन मॅक्नरो ( 170 ) हे  खेळाडू नदालपेक्षा जास्त काळ एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी राहीले आहेत. 

नदालन 2008, 2010, 2013 आणि 2017 या वर्षअखेरीस एटीपी क्रमवारी  अव्वल स्थानी राहीला आहे. 

आज जाहीर झालेली एटीपी क्रमवारी –

1 ) राफेल नदाल (स्पेन )- 8770 

2 )  रॉजर फेडरर (स्विझरलंड ) – 8670 

3) मरीन चिलीच (क्रोवाटीया ) – 4985 

4) अलेक्झांडर झ्वेरेव (जर्मनी )- 4925 

5)  ग्रिगोर दिमीत्रोव ( बल्गेरीया )- 4635 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment