---Advertisement---

नदालने १४व्यांदा मारली French Openच्या फायनलमध्ये धडक, तरीही का झाला निराश?, कारण खूपच धक्कादायक

On: शनिवार, जून 4, 2022 9:07 PM
Rafael-Nadal
---Advertisement---

टेनिसच्या विश्वात प्रसिद्ध असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने १४व्यांदा फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचा विक्रम केला आहे. हा पराक्रम त्याने आपल्या ३६व्या वाढदिवसाच्या क्षणी केला आहे. मात्र, या विजयाचा विशेष आनंद नदालला झाला नाही.

शुक्रवारी (३ जून) फिलीप चॅटरीयर कोर्टवर नदाल आणि ऑलिम्पिक सुवर्ण विजेता अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. या सामन्यात झ्वेरेवने नाणेफेक जिंकत नदालला प्रथम सर्व्ह करण्याचे आव्हान दिले. दोन्ही सेटमध्ये झ्वेरेवने नदालला चांगलाच त्रास दिला, पण त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याची ही झुंज संपुष्टात आली. त्याला पुढे खेळण्यास कठीण जाऊ लागल्याने नदाल पुढच्या फेरीत पोहोचला.

पहिल्या सेटमध्ये नदालची सर्विस तोडत झ्वेरेवने सेट ३-१ असा आपल्या पक्षात केला होता. येथे नदालने त्याचा अनुभव पणाला लावत पहिला सेट ७(१०)-६(८) असा जिंकला.

नदालने दुसऱ्या सेटची आक्रमक सुरूवात केली, तर झ्वेरेवने पुन्हा एकदा चांगला खेळ करत सेट ४-२ असा केला. नंतर नदालने सांभाळून खेळत दुसरा सेट ६-६ असा टाय-ब्रेकपर्यत आणला. यावेळी दोन्ही खेळाडूंनी सगळा जोर लावत सेट आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. मात्र, याचवेळी झ्वेरेवच्या पायाच्या मांसपेशीत ताण आला. त्याला दुखापतीमुळे कोर्टबाहेर पडावे लागले पण त्याने थोड्या वेळाने कुबड्यांच्या मदतीने पुनरागमन केले. मात्र, असह्य वेदना झाल्याने तो पुढे खेळण्यास असमर्थ दिसला. यामुळे नदाल पुढच्या फेरीस पात्र ठरला.

या सामन्याच्या शेवटी झ्वेरेवला चालणेही शक्य न झाल्याने तो व्हीलचेयरवरून कोर्टच्या बाहेर जाताना दिसला. हे क्षण एका टेनिसच्या प्रेक्षकासाठी अंत्यत वाईट होते, तर नदालने ‘हा एक दुर्देवी क्षण असून त्याला लवकर ठीक हो’ असा संदेश दिला आहे.

लाल मातीचा बादशहा अर्थातच नदालने १३वेळा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहे, तर २१ ग्रॅंड स्लॅम त्याच्या नावावर आहे. २२वे ग्रॅंड स्लॅम जिंकण्याच्या इराद्याने नदाल रविवारी (५ जून) कोर्टवर उतरणार आहे. यावेळी अंतिम सामन्यात त्याला नॉर्वेच्या कॅस्पर रूडशी दोन हात करावे लागणार आहे.

तत्पूर्वी नदालने यंदाच्या फ्रेंच ओपनचा प्रबळ दावेदार असणाऱ्या नोवाक जोकोविचला उपांत्यपूर्व फेरीत ६-२, ४-६, ६-२, ७(७)-६(४) असे पराभूत केले होते.

नदालने जिंकलेली ग्रॅंड स्लॅम
फ्रेंच ओपन -१३
अमेरिकन ओपन – ४
ऑस्ट्रेलियन ओपन – २
विम्बल्डन – २

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

एक रॅकेट हातात घेऊन जाणे ते प्रत्येक पाँईटनंतर घाम पुसणे, राफेल नदालबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ टाकणारा ‘तो’ जितक्या वेगाने प्रसिद्ध झाला तितक्याच वेगाने क्रिकेटमधून गायब झाला

बाबो! IPLच्या एका सामन्याची किंमत होणार १०० कोटी? बनू शकते जगातील दुसरी महागडी स्पोर्ट्स प्रॉपर्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---