जागतिक स्तरावर टेनिस आणि फुटबॉल खेळाचे चाहते भरपूर प्रमाणात आहेत. त्यातच या खेळांच्या बक्षिसाची रक्कमही तेवढीच मोठी आहे. टेनिसमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन ओपन, विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन या चार प्रमुख ग्रॅंड स्लॅम्स स्पर्धा होतात. त्यामध्ये खेळण्याचे आणि चांगली कामगिरी करण्याचे स्वप्न प्रत्येक टेनिसपटू पाहत असतो.
नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत अंतिम सामन्यात विजयी ठरत स्पेनच्या राफेल नदालने त्याला ‘लाल मातीचा बादशहा’ का म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्याने या सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा ६-३, ६-३, ६-० असा पराभव करत कारकिर्दीतील १४वी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. यामुळे त्याचे एकेरीमध्ये एकूण २२ ग्रॅंड स्लॅम्स झाले आहेत.
नदालने २०२२मध्ये पायाच्या दुखापतीतून सावरत उत्तम कामगिरी केली आहे. यावर्षी त्याने चार एकेरी स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामध्ये मेलबर्न समर ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, मेक्सिकन ओपन आणि फ्रेंच ओपन यांचा समावेश आहे. या चारही स्पर्धांमध्ये त्याने ५,७१८,६०७ डॉलर (४४.४ कोटी रूपये) एवढी रक्कम पुरस्कारामधून प्राप्त केली आहे.
नदालने कारकिर्दीत आतापर्यत ९२ एकेरी आणि ११ दुहेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले आहेत. यामध्ये मिळालेल्या त्याच्या पुरस्काराचे मानधन एकूण १३०,६८१,४७२ (जवळ जवळ १०१५ कोटी रूपये) डॉलर एवढे झाले आहे. त्याचबरोबर एटीपी क्रमवारीत ३६ वर्षीय नदाल चौथ्या क्रमांकावर आहे.
एटीपीच्या सार्वकालिन कामगिरीमध्ये जिंकत पुरस्कारमधून प्राप्त केलेल्या रक्कमेच्या यादीत सर्बियाचा नोवाक जोकोविच अव्वल क्रमांकावर आहे. त्याने ८७ एकेरी आणि एक दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहेत. यावेळी त्याने १५६,५४१,४५३ डॉलर (१२१६ कोटी रूपये) रक्कम पुरस्कारामधून कमावली आहे. तर यामध्ये नदालने स्विझर्लंडच्या रॉजर फेडररला मागे टाकले आहे. त्याने १३०,५९४,३३९ डॉलर (१०१४ कोटी रूपये) प्राप्त केले असून तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १०३ एकेरी आणि ८ दुहेरी विजेतेपद पटकावले आहेत.
एटीपीच्या सार्वकालिन कामगिरीमध्ये पुरस्कारमधून सर्वाधिक रक्कम प्राप्त करणारे टेनिसपटू-
१. नोवाक जोकोविच (१५६,५४१,४५३ डॉलर)/ १२१६ कोटी रूपये
२. राफेल नदाल (१३०,६८१,४७२ डॉलर)/ १०१५ कोटी रूपये
३. रॉजर फेडरर (१३०,५९४,३३९ डॉलर)/ १०१४ कोटी रूपये
४. अँडी मरे (६२, ७३३, ७४९ डॉलर)/ ४८७ कोटी रूपये
रुडने फ्रेंच ओपनचा अंतिम सामना खेळत विक्रम केला आहे. सक्रिय टेनिसपटूमध्ये चारही ग्रॅंड स्लॅम्सच्या उपांत्यफेरीत पोहोचणारा किंवा खेळणारा तो जोकोविच, नदाल, फेडरर आणि मरे नंतर पाचवाच खेळाडू ठरला आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Mithali Raj Retirement। मितालीबद्दल माहीत नसलेल्या ‘या’ खास गोष्टी घ्या जाणून
एक रॅकेट हातात घेऊन जाणे ते प्रत्येक पाँईटनंतर घाम पुसणे, राफेल नदालबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी
शिवम मावीच्या चेंडूवर मयांक अग्रवाल झाला दुखापतग्रस्त, व्हिडिओ होतोय व्हायरल