जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या टेनिसपटू राफेल नदालने पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या युएस ओपनच्या तयारीसाठी सिनसिनाटी मास्टर्समधून माघार घेतली आहे. सिनसिनाटी मास्टर्स ही स्पर्धा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.
नदालने रविवारीच (१२ऑगस्ट) टोरंटो मास्टर्स जिंकून त्याच्या कारकिर्दीतील ८०वे विजेतेपद जिंकले. यावेळी त्याने अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टेफॅनो सिटसीपॅसला ६-२, ७-६(४) असे पराभूत केले.
३२ वर्षीय नदालने एटीपी मास्टर्स १०००चे एकूण ३३ तर रॉजर्स कपचे ४ विजेतेपद जिंकले आहेत.
“शरीराची काळजी घेण्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही असे कारण नाही ज्यामुळे मी सिनसिनाटीमधून माघार घेत आहे”, असे नदालने सांगितले.
तसेच त्याने ट्विटरवर याबद्दलची अधिक माहिती दिली. यामध्ये त्याने सिनसिनाटी स्पर्धेचे संचालक आंद्रे सिल्वा यांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.
who after speaking to him on the phone understood what I said and understand the situation. I am sure the tournament will be a success and I wish him and his team all the best.
I am also sad for those amazing fans in Cincy and around who always gave me great support.— Rafa Nadal (@RafaelNadal) August 13, 2018
“युएस ओपननंतर डेविस कप स्पर्धेची उपांत्य फेरीही असल्याने पुढील आठवढ्यात अजून काय होणार याबद्दल मला निर्णय घ्यायचा आहे”,असे नदाल म्हणाला.
“मला हा खेळ आवडतो आणि तो खेळायचाही आहे. पण काही वेळा शरिराला आरामही आवश्यक असतो”, असेही तो पुढे म्हणाला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या: