भारताच्या कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मागील काही दिवसांपासून आपली लय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे, त्यामुळे त्याच्यावर चहुबाजूंनी टीकाही होत आहे. दरम्यान, आता त्याच्या संघातील जागेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अशाचत नुकतेच रहाणेने खळबळजन विधान केले होते, ज्याची चर्चा भारतीय क्रिकेटविश्वात जोरदार होत आहे. तसेच रहाणेने त्याच्या विधानातून भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यावर निशाणा साधल्याचेही म्हटले जात आहे.
काय आहे नक्की प्रकरण?
भारतीय संघाने २०२०-२०२१ ला ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. हा दौरा भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरला. कारण भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. तसेच या मालिकेतील अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गॅबा येथे जिंकला होता.
याच मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघावर ३६ धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढावली होती. पण पहिल्या सामन्यातील मोठे अपयश विसरत भारताने जोरदार पुनरागमन करत ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकून इतिहास रचला होता. त्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने नेतृत्त्व केले होते. पण, त्यानंतर पालकत्त्व रजा घेऊन तो मायदेशी परतला होता. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत रहाणेने प्रभारी कर्णधारपद सांभाळले होते.
त्यामुळे भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या कसोटी मालिका विजयात रहाणेचे योगदान मोठे राहिले होते. त्याने मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शतकही साजरे केले होते. मात्र, आता रहाणेने म्हणले आहे की, त्याला त्यावेळी योग्य ते श्रेय मिळाले नाही.
रहाणे ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या कार्यक्रमात म्हणाला की, “जेव्हा मला लोक म्हणतात की तुझी कारकिर्द संपली तेव्हा मी हसतो. ज्यांना खेळ समजतो ते अशाप्रकारे बोलत नाहीत. ऑस्ट्रेलियात जे झाले आणि त्याअगोदरचे माझे क्रिकेटमधील योगदान सर्वांनाच माहित आहे. ज्या लोकांना खेळाप्रती प्रेम आहे तेच समजून घेण्याच्या गोष्टी बोलतात.”
तो पुढे म्हणाला, “ऑस्ट्रलियामध्ये मी काय केले, हे मला माहित आहे. मला कोणाला सांगायची गरज नाही. मला श्रेय घेण्याची सवय नाही. हा काही गोष्टींचे निर्णय मी मैदानात घेतले आणि काही ड्रेसिंग रुममध्ये घेतले. परंतु, या सगळ्याचे श्रेय दुसऱ्यांनाच मिळाले. आम्ही मालिका जिंकलो हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा लोकांना नंतर काय सांगितले गेले, जे नंतर सोशल माध्यमांवर आले की हे आम्ही केले, हा आमचा निर्णय होता, हे त्यांचे बोलणे होते. परंतु, मी काय निर्णय घेतले हे मला माहित आहे.”
रहाणेने साधला निशाणा
रहाणेने केलेल्या विधानांमधून त्याने रवी शास्त्री आणि अन्य खेळाडूंवर निशाणा साधल्याची चर्चा होत आहे. अनेकांनी याबद्दल सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. तसेच अनेक युजर्सने रवी शास्त्रींनी रहाणेचे श्रेय चोरल्याचेही म्हटले आहे (Accuses Ravi Shastri).
तसेच त्या दौऱ्यावेळी रवी शास्त्री यांनी भारतीय संघाचा उल्लेख कोहलीचा संघ असा केला होता, त्याचबरोबर त्यांनी रहाणेचे विराटच्या अनुपस्थितीत कौतुक केले नव्हते, या गोष्टीचे देखील रहाणेला वाईट वाटले असावे असा कयास लावला जात आहे.
Toast of the nation after leading India to one of our best series wins in Aus. Today people are calling for his head. How is @ajinkyarahane88 dealing with it? Does he believe he has cricket left in him? How imp is Ranji Trophy? #Promo #BackstageWithBoria Show 2pm @AgeasFederal pic.twitter.com/nbbdsFiLa8
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) February 10, 2022
https://twitter.com/Jokeresque_/status/1491676254948724736
Shastri said " This is Virat Kohlis Team "
So Rahane definitely bodying him hereMore power to you Jinks 🔥🔥 https://t.co/sh0cnrD6m8
— Kaygee (@Kaygee4_5) February 10, 2022
Bodied Shastri well done Rahane… This is the highest point in your career now just retire. https://t.co/hGHA3J6maP
— Sai (@akakrcb6) February 10, 2022
The captain who scripted the turnaround at the MCG. And led the team to Conquer Gabba…says that some other people took credit for the decisions he made…and also for the victories. Interesting 🧐
— Aakash Chopra (@cricketaakash) February 10, 2022
I am agree with rahane
Ravi Shastri give credit to Virat Kohli pic.twitter.com/779Mp6sTeo
— Marathistockmarket07 (@Marathistockma1) February 11, 2022
त्यावेळीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील यशासाठी अनेक युवा खेळाडूंना श्रेय देण्यात आले होते. संघातील अनुभवी खेळाडू दुखापतग्रस्त होत असताना देखील युवा खेळाडूंनी दाखवलेल्या जिद्दीसाठी त्यांचे मोठे कौतुक झाले होते. तसेच गॅबा कसोटीत रिषभ पंत आणि शुबमन गिलने केलेल्या खेळींचेही कौतुक झाले होते. पण, या सर्व गोष्टींदरम्यान रहाणे कर्णधार होता, हे अनेकजण विसरले असल्याचीच आठवण रहाणेने करून दिल्याचे त्याच्या विधांनामधून दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्याला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात बघायचंय’, हरभजनने युवा गोलंदाजावर व्यक्त केला विश्वास
भारत-वेस्ट इंडिज टी२० मालिकेसाठी प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश? जाणून घ्या सविस्तर