कोलकाता | येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणेने वनडे कारकिर्दीतील २०वे अर्धशतक साजरे केले आहे. अजिंक्य रहाणे या मालिकेत चांगली कामगिरी करून संघात आपले स्थान कायम राखण्याचे प्रयत्न करत आहे.
रहाणेने ८१ आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात ३४च्या सरासरीने २६२१ धावा केल्या आहेत. त्यात त्याने ३ शतके लगावले आहेत. रहाणेने भारताचा तिसरा सलामीवीर फलंदाज आहे. धवन काही कारणास्तव संघात सामील नाही म्हणूनच रहाणेला संधी देण्यात आली आहे.
भारताची आता स्थिती २ बाद १२१ अशी आहे. भारतचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा ७ धावत तंबूत परतला. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रहाणे खेळत आहेत. कोलकाताच्या मैदानावर जर भारताला विजय मिळवायचा असेल तर मोठी धावसंख्या उभारणे अनिवार्य आहे.