दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवर फलंदाज शिखर धवनने यंदाच्या आयपीएल हंगामात शानदार कामगिरी केली आहे. त्याने ५०० पेक्षाही अधिक धावा यावर्षीच्या आयपीएल हंगामात केल्या आहेत. एवढेच नाही त्याने 2 नोव्हेंबरला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धही शानदार अर्धशतक करत दिल्लीला प्ले ऑफमध्ये पोहचवण्याच महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने अजिंक्य रहाणेबरोबर 88 धावांची भागीदारीही केली. त्यानंतर आता शिखरने रहाणेचं कौतुल केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य राहणे इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. हंगामातील जवळपास निम्मे सामने झाल्यानंतर त्याला संघात खेळायची संधी मिळाली होती. सुरुवातीच्या काही सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या महत्वाच्या सामन्यात त्याने शिखर धवनबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी करत अर्धशतक झळकावले आणि संघाला विजय मिळवून दिला.
क्वालिफायर-1 मध्ये मुंबईविरुद्ध होईल सामना
बेंगलोरला पराभूत करून दिल्लीने प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. आयपीएल 2020 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आता दिल्लीला गुरुवारी (5 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागेल.
….तेव्हा मी नेहमीच मोकळेपणाने खेळतो -धवन
मुंबईविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलताना धवन म्हणाला की, “राहणे संघात असला की मला मुक्तपणे खेळायची संधी मिळते. त्याच्या फलंदाजीमुळे मधल्या फळीत स्थिरता आली आहे. बेंगलोरविरुद्ध त्याने चांगला डाव खेळला. जेव्हा जेव्हा तो संघात असतो, तेव्हा ते संघासाठी नेहमीच फायद्याचं असतं. तो माझ्यासोबत फलंदाजी करत असतो तेव्हा मी नेहमीच मोकळेपणाने खेळतो.”
सातत्य राखणे सर्वात महत्वाची गोष्ट
शिखर धवन सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे आणि त्याने या हंगामात दोन शतकांच्या मदतीने 525 धावा केल्या आहेत. याबद्दल बोलताना धवन म्हणाला की, “मी गेल्या चार वर्षांपासून प्रत्येक हंगामात 500 हून अधिक धावा करत आहे, पण या हंगामात सलग दोन शतके ठोकली आणि सलग दोनदा शून्यावर बाद झालो आहे. जे यापूर्वी कधीही झाले नव्हते. माझ्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या फॉर्ममध्ये सातत्य राखणे आणि संघात योगदान देणे. सर्वच हंगाम माझ्यासाठी चांगले राहिले आहेत. मी नेहमीच उत्कटतेने खेळतो.”
रिकी पॉंटिंग नेहमीच करतात समर्थन
संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंगबद्दल बोलताना धवन म्हणाला की, “ते प्रत्येक बाबतीत आमचे समर्थन करतात आणि वेगवेगळ्या परिस्थितीचे आम्हाला स्पष्टीकरण देतात. ते नेहमीच चर्चा करायला तयार असतात. कोचिंग स्टाफच्या संदर्भात अभिप्रायदेखील ते विचारतात.”
महत्त्वाच्या बातम्या –
टेबलवर पाय ठेवून मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या क्रिकेटरची निवृत्ती
माझे बाबा सगळ्यात भारी! रहाणेची इवलुशी मुलगी बनलीय चीयरलीडर; भन्नाट व्हिडिओ व्हायरल
संतापजनक! कोरोना पाॅझिटीव्ह असूनही ‘तो’ क्रिकेटर उतरला मैदानावर, अन्…
ट्रेंडिंग लेख –
‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!