भारतीय संघाचा कसोटी स्पेशलिस्ट अजिंक्य रहाणे सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातीर रणजी सामन्यात रहाणे सध्या खेळत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरू असून रहाणेच्या नेतृत्वातील मुंबई संघ प्रथम फलंदाजी करत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी रहाणेसह मुंबईच्या वरच्या फळीतील फलंदाज झटपट विकेट्स गमावल्या. आधीच राष्ट्रीय संघातून बाहेर झालेला रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्येही अपेक्षित प्रदर्शन करताना दिसत नाहीये.
अजिंक्य रहाणे () 2024 वर्ष अपेक्षित पद्धतीने सुरुवात करू शकला नाही. रणजी ट्रॉफी हंगामातील आपला चौथा सामना मुंबई संघ उत्तर प्रदेशसोबत खेळत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी मुंबई संघ सर्वबाद झाला. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वातील मुंबईने 59.2 षटकांमध्ये 198 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत उत्तर प्रदेशने एका विकेटच्या नुकसानावर 53 धावा केल्या.
अजिंक्य रहाणे हंगामातील पहिल्या चार पैकी तीन सामन्यांमध्ये खेळू शकला. त्याने रणजी ट्रॉफी हंगामातील चार डावांमध्ये अवग्या 24 धावा केल्या आहेत. त्याने आंद्र प्रदेशविरुद्ध शुन्यावर विकेट गमावली होती. केरळविरुद्ध खेळताना रहाणे पहिल्या डावात शुन्य, तर दुसऱ्या डावात 16 धावा करून बाद झाला. असे असले तरी, उत्तर प्रदेशविरुद्ध शुक्रवारी (26 जानेवारी) रहाणे संघाला चांगली सुरुवात मिळवून देईल, अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा होती. पण 29 चेंडूत 8 धावा केल्यानंतर त्याने विकेट गमावली. यावेळी गोलंदाजी अंकित राजपूत करत होता, तर शिवम शर्मा याने रहाणेचा झेल पकडला.
रहाणे भारतीय क्रिकेट इतिसाहातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक राहिला आहे. पण मागच्या काही वर्षांमध्ये चेतेश्वर पुजारा आणि त्याला अपेक्षित संधी मिळताना दिसल्या नाहीत. भारतासाठी खेळलेल्या 85 कसोटी सामन्यांमध्ये रहाणेने 5077 धावा केल्या आहेत. यात 12 शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच रहाणेने भारतीय संघात पुनरागमनाची इच्छा व्यक्त केली होती. सोबतच आपल्याला 100 कसोटी सामन्यांचा आकडा पूर्ण करायचा आहे, असेही म्हणाला होता. पण सध्याच्या ताचा फॉर्म पाहता भारतीय संघातील त्याचे पुनरागमन अधिकच लांबताना दिसत आहे.
दुसरीकडे भुवनेश्वर कुमार देशांतर्गत क्रिकेटमधील पुनरागमनानंतर जबरदस्त प्रदर्शन करत आहे. बंगालविरुद्ध उत्तर प्रदेशकडून खेळताना भुवनेश्वरने 41 धावा देऊन आठ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच मुंबईविरुद्ध खखेळताना त्याने जय विस्टा (27) आणि शिवम दुबे (4) यांना स्वस्तात बाद केले. (Rahane’s bat, out of the Test team, Ranjith also quiet, scored only 24 runs in 2024)
महत्वाच्या बातम्या –
26 जानेवारीला शतक झळकावणारे भारतीय फलंदाज, पाहा कोणीकोणी केलाय हा कारणामा
पुजारा-रहाणेचं करिअर संपलं? रोहित शर्माच्या ‘या’ निर्णयामुळे चर्चांना उधान