---Advertisement---

अरेरे! अंतिम फेरीच्या जवळ पोहोचलेल्या नेमबाज राही सरनोबत अन् मनु भाकर अपयशी, फायनलमधून बाहेर

On: शुक्रवार, जुलै 30, 2021 7:50 AM
---Advertisement---

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) नेमबाजीतील महिलांच्या २५ मीटर पिस्टल गटातील रॅपिड राऊंडची पात्रता फेरी पार पडली. यामध्ये भारताच्या दोन नेमबाजांचा समावेश होता. ते भारतीय महिला नेमबाज म्हणजेच मनु भाकर आणि राही सरनोबत होय. या दोघींनीही निराश केले आहे. २५ मीटरच्या पिस्टल गटातील रॅपिड राऊंडच्या पात्रता फेरीत मनुने १५ व्या, तर दुसरीकडे राही ३२ व्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे त्यांना अंतिम फेरीसाठी पात्र ठरता आले नाही.

पहिलीच ऑलिंपिक खेळत असलेल्या मनुने रॅपिडच्या पहिल्या सीरिजमध्ये ९६, दुसऱ्या सीरिजमध्ये ९७ आणि तिसऱ्या सीरिजमध्ये ९७ स्कोरसह २९० गुण मिळवले आहेत. अशाप्रकारे तिने प्रीसिजनमध्ये २९२ आणि रॅपिडमध्ये २९० असे मिळून एकूण ५८२ गुण मिळवले.

दुसरीकडे राहीने रॅपिडच्या पहिल्या सीरिजमध्ये ९६, दुसऱ्या सीरिजमध्ये ९४ आणि तिसऱ्या सीरिजमध्ये ९६ स्कोर केला आहे. तिने प्रीसिजनमध्ये २८७ आणि रॅपिडमध्ये २८६ ५७३ गुण आहेत. (Rahi Sarnobat and Manu Bhaker fail to qualify for finals)

रॅपिड राऊंडमधून अव्वल ८ खेळाडू अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतात.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-रॅपिड राऊंडमध्ये भारतीय नेमबाज मनु अन् राहीची असेल खरी परीक्षा; पात्रता फेरीत या स्थानावर मिळवलाय ताबा

-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---