---Advertisement---

आर पळं की? 140 किलोच्या बलदंड कॉर्नवॉलचा रन-आऊट पाहून आवरणार नाही हसू

On: शुक्रवार, ऑगस्ट 18, 2023 6:43 PM
Rahkeem Cornwall
---Advertisement---

वेस्ट इंडीजमधील कॅरेबियन प्रीमियर लीग म्हणजेच सीपीएल स्पर्धेच्या नव्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली. हंगामातील दुसऱ्या सामन्यात सेंट लुसिया किंग्स विरुद्ध बार्बाडोस रॉयल्स हे संघ आमने-सामने आले. यामध्ये सेंट लुसिया संघाने 54 धावांनी मोठा विजय मिळवत स्पर्धेत विजयी सुरुवात केली. मात्र, या सामन्यात बार्बाडोस संघाच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर एक हास्यास्पद गोष्ट पाहायला मिळाली.

सेंट लुसिया संघाने दमदार फलंदाजी करताना सर्वच फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर 202 धावांचे आव्हान ठेवले.‌ या धावांचा पाठलाग करताना रॉयल्स संघासाठी अष्टपैलू रहकीम कॉर्नवॉल व कायले मेयर्स ही जोडी मैदानात उतरली. सेंट लुसिया संघासाठी पहिले षटक मॅथ्यू फोर्ड टाकत होता. पहिला चेंडूचा सामना करत असलेल्या कॉर्नवॉल याने पायावर मिळालेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने टोलवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या ख्रिस सोल याच्याकडून तो चेंडू व्यवस्थित पकडला गेला नाही.

या चुकीचा फायदा घेत मेयर्स हा वेगाने स्ट्राइकला धावत आला. मात्र, शरीराने काहीसा मोठा असलेला कॉर्नवॉल अगदी निवांतपणे चालत नॉन स्ट्राइककडे येत होता. सोलने अगदी वेळ घेत नेम धरून नॉन स्ट्राइक च्या स्टम्पसवर निशाणा साधला. त्याचा हा अचूक निशाणा ठरल्याने कॉर्नवॉल बाद झाला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या सामन्याचा विचार केल्यास, प्लेसिस व सीन विल्यम्स यांच्या खेळाच्या जोरावर किंग्स संघाने 201 धावा उभ्या केल्या होत्या. याच्या प्रतिउत्तरात नईम यंग याने सर्वाधिक 48 धावा करत रॉयल संघासाठी योगदान दिले. फोर्ड याने सर्वाधिक तीन बळी मिळवत किंग्सला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.

(Rahkeem Cornwall Funny Run Out In CPL)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---