अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज विश्वचषक स्पर्धेत संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. विश्वचषकात रविवारी (15 ऑक्टोबर) अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील रोमांचक सामना पाहायला मिळाला. अफगाणिस्तानने या सामन्यात 69 धावांनी विजय मिळवला. मात्र, रहमनुल्लाह गुरबाजने केलेले एक कृत्य त्याला महागात पडल्याचे समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार रहमनुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याने आयसीसीच्या आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. त्याच्याकडून लेव्हल एकचे उल्लंघन झाले असून रविवारी इंग्लंडविरुद्धच्या विश्चचषक सामन्यात हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. गुरबाजने कलम 2.2च्ये उल्लंघन यामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान, क्रिकेट उपकरणे, कपडे, मैदानातील उपकरणांचा गैरवापकर करण्याचा समावेश आहे. गुरबाजने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विकेट गमावल्यानंतर हातातील बॅट सीमारेषा आणि त्याठिकाणी असलेल्या खुर्चीवर मारली.
अशात तो आयसीसी आचार संहितेच्या 2.2 कलमानुसार दोषी आढळला आहे. मागच्या 24 महिन्याध्ये गुरबाजकडून झालेली ही पहिली चूक असून यासाठी त्याला एक डीमेरिट पॉइंट मिळाला आहे. 24 महिन्यांमध्ये एखाद्या खेळाडूने चार किंवा त्यापेक्षा जास्त डीमेरिट पॉइंट्स मिळवले, तर आयसीसीकडून त्या खेळाडूवर काही सामन्यांसाठी बंदी घातली जाते. गुरबाजची चूक ही लेव्हल एकची असल्यामुळे त्याला सामना शुल्काच्या 50 टक्के रक्कम भरावी लागू शकते.
अफगाणिस्तानच्या डावातील 19व्या षटकात हा प्रकार घडला. गुरबाजने 57 छेंडूत 80 धावा केल्यानंतर संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली होती. मात्र, 19व्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो धावबाद झाला. संघाची धावसंख्या 122 अशताना गुरबाजच्या रुपात अफगाणिस्तानने तिसरी विकेट गमावली. ही अफगाणिस्तान आदिर राशिद याला सलग दुसऱ्या चेंडूवर मिळालेली दुसरी विकेट ठरली होती. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 284 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बलाढ्य समजला जाणारा इंग्लंड संघ 215 धावांवर सर्वबाद झाला. मुजीब उर रहमान याने 28 धावांची खेळी केली आणि सोबतच 3 विकेट्स देखील घेतल्या. अफगाणिस्तानच्या विजयात मुजीबचे योगदान महत्वाचे असल्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. (Rahmanullah Gurbaz break Level 1 of the ICC Code of Conduct.)
महत्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या सामन्याआधीच बांगलादेश मोठा धक्का, ‘हा’ मॅच विनर खेळाडू होणार सामन्यातून बाहेर?
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय! लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्या फलंदाजाला दिली खेळण्याची परवानगी