भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला सर्व युवा क्रिकेटपटू आपला आदर्श मानतात. केवळ भारतच नव्हे तर विदेशातील खेळाडू त्याच्याकडून अनेक वेळा सल्ला घेताना दिसतात. अशात आता अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटपटू रहमानुल्लाह गुरबाज याने धोनीबाबत मोठा खुलासा केला आहे. आयपीएल दरम्यान धोनी आपल्याशी काय बोलला हे आपण एका वहीत लिहून ठेवल्याचे त्याने सांगितले.
गुरबाज यावर्षी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळताना दिसत होता. कोलकाता संघ स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करू शकला नसला तरी गुरबाज याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने या हंगामात अकरा सामने खेळताना 20.64 च्या सरासरीने 277 धावा केल्या. तो संघासाठी तिसऱ्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
नुकतेच एका भारतीय वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने आयपीएलमधील आपल्या अनुभवांचे कथन केले. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्याबद्दल बोलताना तो म्हणाला,
“धोनीशी माझी पहिली भेट मागील वर्षी मी गुजरात संघासाठी खेळत असताना झाली होती. ज्यावेळी मी त्याला पहिल्यांदा भेटलो त्यावेळी मी काय बोलावे हे मला सुचत नव्हते. त्याने स्वतः पुढाकार घेत माझ्याशी संवाद साधला. ज्यामुळे मी काहीसा रिलॅक्स झालो. यावर्षी मी जेव्हा त्याच्याशी बोललो त्यावेळी अत्यंत मनमोकळेपणाने बोलू शकलो.”
तो पुढे म्हणाला,
“क्रिकेट लाईफस्टाईल कशी सांभाळावी, याबाबत मी त्याच्याकडून सल्ला घेतला. त्यांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या सर्व मी एका ओळीत लिहून ठेवल्या आहेत.”
गुरबाज सध्या अफगाणिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. तो सध्या श्रीलंकेतलं लंका प्रीमियर लीग खेळताना दिसत आहे.
(Rahmanullah Gurbaz Reveal Big Thing About MS Dhoni)
महत्वाच्या बातम्या-
आगामी टी20 विश्वचषकाबद्दल रोहितने दिली लक्षवेधी प्रतिक्रिया, म्हणाला..
वर्ल्डकपसाठी पाकिस्तानची तयारी सुरू! ‘या’ खास व्यक्तीला केले पाचारण