गुजरातचा सलामीवीर प्रियांक पांचाळ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारत अ संघाचे नेतृत्व करत आहे. २३ नोव्हेंबरपासून हा दौरा सुरू झाला आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर तीन ते चार दिवसीय दिवसीय मालिका खेळणार असून, या सर्व सामन्यांची मालिका ब्लोमफॉन्टेन येथे होणार आहे. पहिला सामना सुरू झाला असून पहिल्या २ दिवसाच्या खेळात भारतीय गोलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. दक्षिण आफ्रिका अ संघाने सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे.
भारतीय युवा गोलंदाज राहुल चाहर हे देखील या दौऱ्याचे सदस्य आहेत. याच चहरने परदेशात चांगला चहा मिळाल्यानंतर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रतिक्रिया दिली आहे, जी व्हायरल होत आहे. या प्रतिभावान लेग-स्पिनरने शेअर केलेल्या रील व्हिडिओमध्ये वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि गोलंदाजी अष्टपैलू सौरभ कुमार देखील दिसत आहेत. राहुल चहरचा हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे आणि चाहत्यांनाही तो खूप आवडला आहे.
राहुल चहर, नवदीप सैनी आणि सौरभ कुमार हे तिघेही दक्षिण आफ्रिकेत त्यांना दिलेला चहा पाहून खूप प्रभावित झाले. आपल्या आनंदी प्रतिक्रियेने त्याने चाहत्यांनाही हसवले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना राहुल चहरने “दक्षिण आफ्रिकेत चांगला चहा मिळाल्यावर आमची प्रतिक्रिया,” असे कॅप्शन दिले आहे.
युजवेंद्र चहलच्या अगोदर संयुक्त अरब अमिरातीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या टी२० विश्वचषकासाठी राहुल चहरची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. तथापि, नंतर न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी त्याला संघातून वगळण्यात आले. त्याऐवजी दक्षिण आफ्रिकेतील लाल-चेंडूंच्या सामन्यांसाठी भारत अ संघात त्याचा समावेश करण्यात आला. २०२१ च्या टी२० विश्वचषकासाठी संघात राहुल चहरचा समावेश करण्यात आला होता. परंतु तो सर्व सामन्यांमध्ये बेंचवर बसला होता, मात्र केवळ नामिबियाविरुद्धच्या भारतीय संघाच्या अंतिम सुपर १२ सामन्यासाठी त्याची निवड झाली होती.
https://www.instagram.com/reel/CWm70dJqdQt/?utm_source=ig_web_button_share_sheet
भारत अ विरुद्ध पहिल्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या २ दिवशी दक्षिण आफ्रिका अ संघाचे वर्चस्व
मॅनगॉंग ओव्हलवर प्रथम फलंदाजी करण्यास सांगितल्यानंतर दक्षिण आफ्रिका अ फलंदाजांनी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दमदार कामगिरी केली. सलामीवीर सरेल आरव्ही धावांची तमा न बाळगता बाद झाला. कर्णधार पीटर मलानने नाबाद १६३ धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले. उमरान मलिकने पॅव्हेलियनमध्ये परतण्याआधी टोनी डी जोर्जीनेही शानदार शतक झळकावले. तसेच, जेसन स्मिथने नाबाद अर्धशतक झळकावत दिवसाचा खेळ संपवला. पुढे दक्षिण आफ्रिका संघाने दुसऱ्या दिवशी ५०९ धावांवर डाव घोषित केला.
नवदीप सैनी, अर्जन नागासवाला यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच राहुल चहर आणि उमरान मलिक यांनीही एका फलंदाजाला बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
नंबर वन महिला टेनिसपटू एश्ले बार्टी झाली ‘एंगेज’; इंस्टाग्रामवर शेअर केला खास फोटो
‘या’ पाच अनकॅप्ड खेळाडूंवर आयपीएल मेगा लिलावात पडणार पैशांचा पाऊस
फिरकीपटूंना सामोरे जाण्यासाठी विलियम्सनने लढवली अनोखी शक्कल