---Advertisement---

आहा! आपल्या होणाऱ्या पत्नीसह मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू गोव्यात लुटतोय सुट्ट्यांचा आनंद; रोमँटिक फोटो केला शेअर

On: रविवार, मे 16, 2021 11:02 PM
---Advertisement---

आयपीएल 2021 स्पर्धा रद्द झाल्यानंतर स्पर्धेत भाग घेतलेले खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा स्टार फिरकी गोलंदाज राहुल चाहरही आपल्या कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवत आहे. दरम्यान, राहुल चाहरने आपली होणारी पत्नी ईशानीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. राहुलने हा फोटो हार्टच्या इमोजीसह शेअर केला आहे. ज्याला नेटकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात पसंत केले आहे

आयपीएल 2021 स्पर्धा पुढे ढकलल्यानंतर मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज राहुल चाहर ईशानीसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. राहुल चाहरने स्वत: सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. राहुलने इंस्टाग्रामवर इशानीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये ईशानी राहुलच्या खांद्यावर डोके ठेवले आहे. दोघांचा हा अतिशय रोमँटिक फोटो अनेकांना पसंद पडला आहे.

https://www.instagram.com/p/COz5BFBhJ8I/

काही दिवसांपूर्वीच राहुलने ईशानीसोबतचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. त्या फोटो वेळी त्याने लिहिले होते ‘माझ्या हेअर स्टायलिस्टला भेटा.’ आयपीएलमधील कामगिरीव्यतिरिक्त राहुल चाहर आपल्या सोशल मीडियातील फोटोंमुळे कायम चर्चेत असतो. त्याची हेअरस्टाईलही लोकांना चांगलीच पसंत पडली आहे. ईशानी व राहुल मागील 2 वर्षांपासून सोबत आहेत. तसेच 2019 साली त्यांनी साखरपूडाही केला होता.

https://www.instagram.com/p/CN2WUhSho4f/

राहुल व त्याचा भाऊ दीपक चाहर यांनी आयपीएल 2017 दरम्यान रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून पदार्पण केले होते. यानंतर मात्र दोन्ही भाऊ वेगवेगळ्या संघांकडून खेळतात. दीपक चेन्नई सुपर किंग्सकडून तर राहुल मुंबई इंडियन्सकडून खेळतो. दोघेही आपापल्या संघाचे आघाडीचे गोलंदाज बनले आहेत व दोघांनीही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“त्याला पाचव्या क्रमांकावर खेळवा किंवा मंगळावर, काहीही फरक पडत नाही”, दिग्गजाने एबीवर उधळली स्तुतीसुमने

कोहलीचे समर्थन करणार्‍या सलमान बट्टचा टोला मायकेल वॉनला लागला वर्मी, मग चिडून दिला ‘हा’ रिप्लाय

बटलरने निवडली आयपीएलची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, ‘या’ मातब्बर खेळाडूंना दिले स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---