---Advertisement---

Video: …आणि त्याने चेंडू खाली पडूच दिला नाही; पाहा राहुल चाहरने घेतलेला अवघड झेल

On: शुक्रवार, नोव्हेंबर 6, 2020 11:14 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील पहिला क्वालिफायर सामना गुरुवारी (5 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. हा सामना मुंबईने एकहाती जिंकला. युवा फलंदाज सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनने अर्धशतक झळकावले. या सामन्यात मुंबईने उत्कृष्ट गोलंदाजी केली. मुंबईचा वेगवान गोलंदाज बुमराहने अवघ्या 14 धावात 4 गडी बाद केले. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनेही 2 गडी बाद केले. या सामन्यात मुंबईचा युवा फिरकीपटू राहुल चाहरला एकही गडी बाद करता आला नाही. मात्र त्याने घेतलेल्या झेलची जोरदार चर्चा सुरु आहे.

अक्षर पटेलचा घेतला झेल 
दिल्लीच्या डावाचे 19 वे षटक अष्टपैलू कायरान पोलार्ड फेकायला आला. त्यावेळी दिल्लीचा डावखुरा फलंदाज अक्षर पटेल खेळपट्टीवर खेळत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने लॉन्ग ऑनवर मोठा फटका मारला. चेंडू हवेत होता. त्याचवेळी राहुल चाहरने झेल घेण्यासाठी धाव घेतली. पहिल्या तीन प्रयत्नात त्याला झेल घेण्यात अपयश आले. मात्र चौथ्या प्रयत्नात त्याने हा झेल घेतला.

https://twitter.com/dhruvschandra/status/1324649935355080707

https://twitter.com/im_ravirebel/status/1324614937251962880

मुंबईने केल्या 200 धावा 

नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई संघ प्रथम फलंदाजी करायला मैदानात आला. सलामीवीर क्विंटन डिकॉकने 40 धावांची आक्रमक खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 38 चेंडूत 51 धावा केल्या. युवा प्रतिभावान फलंदाज ईशान किशननेही 55 धावांची उत्कृष्ट खेळी केली. अखेरच्या षटकांत ईशान किशन आणि हार्दिक पंड्याने (14 चेंडू 37 धावा) केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईने 20 षटकांत 200 धावा केल्या.

दिल्लीचा झाला पराभव 
प्रत्युत्तरादाखल दिल्लीची सुरुवात अतिशय खराब झाली. एकही धाव न काढता दिल्लीने 3 गडी गमावले.अवघ्या 41 धावांवर दिल्लीचा निम्मा संघ तंबूत परतला. अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस (46 चेंडू, 65 धावा) आणि अक्षर पटेलने (33 चेंडू, 42 धावा ) चांगली खेळी केली पण त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात यश आले नाही. दिल्लीला 20 षटकांत केवळ 143 धावा करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

“जो आया हैं, वो जायेगा भी” मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीची उडतेय खिल्ली; पाहा भन्नाट मीम्स

क्वालिफायर सामन्यानंतर पर्पल कॅप बुमराहच्या डोक्यावर तर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठे बदल

मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये झालं गणपती व लक्ष्मीचं दर्शन, पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---