पुणे | प्रो कबड्डीचा ८३ वा सामना आज तेलुगू टायटन्स विरुद्ध तमिल थलाईवाज संघात पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. तेलुगू टायटन्स संघाचा स्टार रेडर आणि भारतीय कबड्डीचा पोस्टर बाॅय राहुल चौधरीसाठी हा सामना खास ठरणार आहे.
प्रो कबड्डी इतिहासात ८०० गुण घेणारा पहिला खेळाडू होण्यासाठी त्याला केवळ ९ गुणांची गरज आहे. राहुलने आजपर्यंत ८९ सामन्यात ७९१ गुण घेतले आहे. प्रो कबड्डीत सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो अव्वल स्थानी आहे. त्याने ७९१ पैकी ७४४ गुण रेडिंगमधून तर २२ गुण बचावातून कमावले आहेत.
प्रो कबड्डीत आजपर्यंत ३०४ खेळाडूंनी एकतरी गुण कमावला आहे. या सर्वांमध्ये राहुल हा ७९१ गुणांसह अव्वल स्थानी आहे.
राहुलपाठोपाठ दुसऱ्या स्थानी डुबकी किंग परदिप नरवाल असून त्याने ७७ सामन्यात ७७८ गुण कमावले आहे. परदिपलाही या हंगामात ८००गुण कमावण्याची संधी आहे.
राहुलला या हंगामात लौकीकाला साजेल अशी कामगिरी अजूनपर्यंत तरी करता आली नाही. त्याने या हंगामात १० सामन्यांत ८१ गुण घेतले आहे.
त्याची सर्व हंगामातील मिळून सामन्यात गुण घेण्याची सरासरी ८.८८ अशी आहे तर या हंगामात ती ८.१० वर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट जगातील १११७ खेळाडूंना ठरला भारी, जाणून घ्या काय आहे कारण
–कृणाल पंड्या आॅस्ट्रेलियात चमकला, केले हे खास विक्रम
–हिटमॅन रोहित शर्मा आता या दिग्गजांमध्ये सामील