पल्लेकेल: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या कसोटी भारताने जबदस्त सुरुवात करताना २०० धावांची सलामी दिली आहे. भारतीय सलामीवीर केएल राहुल याची अर्धशतकी खेळी आणि त्याला तेवढीच जबदस्त साथ देणाऱ्या शिखर धवनच्या नाबाद शतकी खेळीमुळे भारत सुस्थितीत आहे.
आज भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या दोनही सलामीवीरांनी हा निर्णय योग्य ठरवत फटकेबाजी करत ४५ षटकांच्या आतच २०० धावा फलकावर लावल्या. केएल राहुल ८५ धावांवर बाद झाला.
ही अर्धशतकी खेळी करताना केएल राहुलने श्रीलंकेविरुद्ध खेळताना कारकिर्दीतील ९वे कसोटी अर्धशतक केले आहे.या अर्धशतकाबरोबर केएल राहुलने कसोटीमध्ये सलग ७ डावात अर्धशतकी खेळी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील ६वा कसोटीपटू ठरला आहे. याशिवाय भारताकडून सार्वधिक सलग अर्धशतके करण्याचा विक्रम राहुलने आपल्या नावे केला आहे.
भारताकडून गुंडप्पा विश्वनाथ आणि राहुल द्रविड यांनी सहा सलग अर्धशतकं ठोकली आहेत. केएल राहुलने आता या दिग्गजांना मागे टाकले आहे.