---Advertisement---

‘हे एक मोठे आव्हान’, वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मोठे वक्तव्य

On: बुधवार, नोव्हेंबर 17, 2021 11:10 AM
KL Rahul and Rahul Dravid
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० मालिकेचा थरार लवकरच सुर होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १७ नोव्हेंबर रोजी जयपूरमध्ये पार पडणार आहे. विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहित शर्माला या संघाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी राहुल द्रविड यांना देण्यात आली आहे. दरम्यान, या दोघांनी न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेपूर्वी आपले मत मांडले आहे.

राहुल द्रविड यांनी खेळाडूंबाबत बोलताना म्हटले की, “मी खेळाडूंशी संवाद साधला. टी२० विश्वचषकादरम्यान ते व्यस्त होते. त्या काळात मला कोणाला ही त्रास द्यायचा नव्हता. टी२० विश्वचषकानंतर रोहित शर्माने विराट कोहलीसह अनेक खेळाडूंशी संवाद साधला. तसेच क्वारंटाईन दरम्यान ऑनलाइन संवाद साधला. सपोर्ट स्टाफमधील बरेच लोक आधीच येथे होते, त्यांच्याशीही बोललो. माझे काम खेळाडूंवर लक्ष ठेवणे आहे.”

तसेच केन विललियम्सनच्या अनुपस्थितीबाबत बोलताना राहुल द्रविड यांनी म्हटले की, “न्यूझीलंड संघ एक मजबूत संघ आहे. त्यांनी गेल्या काही वर्षात अप्रतिम कामगिरी केली आहे. गेल्या काही वर्षात या संघात खूप बदल जाणवला आहे. नुकताच त्यांनी भारतीय संघाला पराभूत केले होते.”

तसेच बायो बबल आणि वर्क लोड मॅनेजमेंटबद्दल बोलताना रोहित शर्माने म्हटले की, “आमची योजना आधीपासून तयार आहे. आमचा संघ एक मजबूत संघ आहे. जरी आम्ही आयसीसीची स्पर्धा जिंकलो नसलो, तरी आम्ही चांगली कामगिरी केली आहे. काही गोष्टी आहेत, जिथे आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. त्यावर आम्ही काम करत आहोत. आम्ही कुठल्या इतर संघाला फॉलो करणार नाही. आम्ही स्वतःची एक योजना बनवू. खेळाडू आयपीएल आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात. परंतु, ते जेव्हा भारतीय संघासाठी खेळत असतात, तेव्हा त्यांना एक जबाबदारी द्यावी लागते. आम्ही विश्वचषक स्पर्धेनंतर फ्रेश प्लॅनने मैदानात उतरणार आहोत.”

तसेच वर्क लोड मॅनेजमेंटबद्दल बोलताना राहुल द्रविड म्हणाले की, “वर्कलोड मॅनेजमेंट हा एक महत्वाचा भाग आहे. आम्ही जेवढे सामने खेळत आहोत, त्यानुसार आम्हाला वर्कलोडचे व्यवस्थापन करावे लागेल. जर तुम्ही वर्षभर सतत खेळत असाल, तर तुम्हाला हे करावे लागेल. खेळाडूंची मानसिक आणि शारीरिक गरज शीर्षस्थानी असेल. मोठ्या स्पर्धेसाठी प्रत्येकाला तयार राहावे लागेल. केन विलियम्सन टी२० मालिकेत खेळणार नाहीये. सर्व संघ वर्कलोड मॅनेजमेंट करत आहेत. सर्व संघांसाठी हे आव्हान आहे.”

महत्त्वाच्या बातम्या – 

काय सांगता! ९ वर्षांपुर्वीच रोहितने जयपुरमधेच कर्णधार होण्याच केलं होतं भाष्य, पाहा व्हायरल पोस्ट

रोहितच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड चीत करायला भारतीय संघ उतरणार मैदानात, अशी असू शकते ‘प्लेइंग ११’

धक्कादायक! भारतीय पॅरा बॅडमिंटन खेळाडूंच्या हॉटेलजवळ २ मोठे स्फोट, तर तिघांचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---