रविवारपासून (१८ जुलै) सुरू होणार्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचा फलंदाज संजू सॅमसन चांगली कामगिरी करण्यास तयार आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली सॅमसन मालिकेसाठी तयारी करत आहे. संजू सॅमसन आणि राहुल द्रविड या दोघांनी आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघामध्ये एकत्र काम केले असल्याने ते एकमेकांना जवळून ओळखतात. साल २०१३ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर द्रविड साल २०१४ मध्ये राजस्थान रॉयल्सचा सल्लागार झाला आणि त्याने सॅमसनसह अनेक युवा खेळडूंसह काम केले होते.
26 वर्षीय संजू सॅमसनने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी राहुल द्रविडचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर काही खास आठणीही सांगितल्या आहेत. स्टार स्पोर्ट्स शोमध्ये सॅमसन म्हणाला, भारत अ संघातील प्रत्येक खेळाडू किंवा वरिष्ठ भारतीय संघात जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूला राहुल द्रविडच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आम्ही त्याच्याकडून शिकलो हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे.
संजू सॅमसननी सांगितली जुनी आठवण
संजू सॅमसन पुढे द्रविडबद्दलची एक आठवण सांगताना म्हणाला, ‘मला आठवते एक दिवस मी राजस्थान रॉयल्सच्या पात्रता फेरीसाठी जात होतो. मी चांगली फलंदाजी केली आणि माझी फलंदाजी पाहून राहून द्रविड म्हणाले, तुम्ही माझ्या संघासाठी खेळू शकता का? हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता आणि मी तो कधीही विसरू शकत नाही.’
संजू सॅमसनचा खराब फॉर्म
साल २०१४ मध्ये इंग्लंड दौर्यासाठी सॅमसनची निवड झाली होती. त्याला एक सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर एका वर्षानंतर सॅमसनने झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, पण त्याला साजेशी फलंदाजी करत आली नाही. भारताकडून पुन्हा खेळण्यासाठी त्याला आणखी पाच वर्षे वाट पाहावी लागली. २०२० च्या सुरुवातीला श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना तो ६, ८, २, २३, १५ आणि फक्त १० धावा काढू शकला. आता भारत आणि श्रीलंका संघात सुरु होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत सॅमसन कशी कामगिरी करतो हे पाहावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हुड्डाचे संघ सोडणे बडोदा क्रिकेटचे नुकसान’, विश्वविजेत्या खेळाडूने व्यक्त केली खंत
काय घडलं जेव्हा ‘थाला-चिन्नाथाला’ उभे ठाकले एकमेकांसमोर, स्वतःला रैनाने केला खुलासा
भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागलला लागली ऑलिम्पिकची लॉटरी, पुरुष एकेरीत करणार प्रतिनिधित्व