अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसा भारतीय संघ गुरुवारी (11 जानेवारी) सुरूवात करत आहे. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या भारतीय संघात स्थान मिळाने नाही. या दोघांना संघात न घेतल्यामुळे गुरुवारी अनेक चर्चांना सुरुवात झाली. या दोघांच्या बेशिस्तपणामुळे निवडकर्त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. पण मालिका सुरू होण्याआधी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले.
ईशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे दोन्ही खेळाडू भारतीय संघासाठी महत्वाच आहेत. यावर्षी आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. या विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही टी-20 मालिका महत्वाची आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गजांना तब्बल 14 महिन्यांनंतर पहिल्यांदा टी-20 संघात निवडले गेले आहे. पण ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या युवा खेळाडूंना मात्र अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी 16 सदस्यीय संघात स्थान मिळाले नाही.
माध्यमांतील वृत्तांनुसार ईशान आणि अय्यर वैयक्तिक कारणास्तव अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार नाहीत. पण शुक्रवारी सुरू झालेल्या चर्चेंनुसार या दोघांवर निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन नाराज आहे. कारण दोन्ही युवा खेळाडूंकडून संघाच्या शिस्तिचे पालन झाले नाहीये. शिस्तभंगाची कारवाई म्हणून याय दोघांना अफगाणिस्तानविरुद्ध खेलवण्यात आले नाही, असेही बोलले जात होते. गुरुवारी (11 जानेवारी) सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेआधी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी पत्रकार परिषदेला (Rahul Dravid Press Conference) हजेरी लावली.
पहिल्या टी-20 सामन्याच्या पूर्वसंध्येला द्रिवडला पत्रकारांनी ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्याबाबत प्रश्न विचारला गेला. यावर द्रविडने सर्वांचा मनात असणाऱ्या शंका दूर केल्या. द्रविड म्हणाला, “बातम्या (ईशान आणि अय्यरविषयी) खऱ्या नाहीत. ईशान किशनने विश्रांतीसाठी विचारणा केली होती, त्याने स्वतः या मालिकेतून माघार घेतली आहे. दुसरीकडे श्रेयसने अलिकडच्या काळात भरपूर फलंदाजी केली आहे. याच कारणास्तव तो या मालिकेत खेळत नाहीये. ही कोणतीही शिस्तभंगाची कारवाई नाही, हे सर्व खोटं आहे.”
दरम्यान, ईशानने मानसिक धकाव आल्याचे कारण देत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. पण विश्रांती घेतल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज माजी कर्णधार एमएस धोनी याच्यासोबत दुबईमध्ये पार्टी करताना दिसला. तसेच एका प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रमालाही हजेरी लावली होती.
तसेच श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत अपेक्षित खेळी करू शकला नाही. त्याच्या शॉट सिलेक्शनवर संघ व्यवस्थापन नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याच कारणास्तव अय्यरला रणजी ट्रॉफीत खेळण्याचा सल्ला निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाकडून दिला गेला, अशा चर्चा आहेत. पण अय्यरने त्याऐवजी विश्रांतीला प्रधान्य दिले, ज्यामुळे त्याल अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळाली नाही, असे सांगितले जात होते. दरम्यान, अय्यर गुरुवार (11 जानेवारी) सुरू होणाऱ्या रणजी सामन्यासाठी मुंबई संघात सामील झाला आहे. त्याचसोबत प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या संपूर्ण विशयाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (Rahul Dravid backs Ishan Kishan and Shreyas Iyer at press conference and puts an end to the debate)
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
महत्वाच्या बातम्या –
‘या’ दिवशी सुरू होणार आयपीएल धमाका! फेब्रुवारी ते मार्चमध्ये WPL चे आयोजन
IND vs AFG । ईशानला महागात पडली ‘ती’ पार्टी, निवडकर्ते ऍक्शन मोडमध्ये; अय्यरला वगळण्याचे कारणही समजलं