भारतीय संघाचे मध्यक्रमातील अनुभवी फलंदाज विराट कोहली (virat kohli), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात देखील या तिघांपैकी एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. असे असले तरी, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (rahul dravid) यांना या फलंदाजांवर विश्वास आणि अपेक्षा आहे की, ते चांगली खेळी करून दाखवतील.
दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. परंतु, मध्यक्रमातील फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले. मागच्या सामन्यात पहिल्या डावात चेतेश्वर पुजार शून्य धावांवर बाद झाला होता. विराटने चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत करण्यात तो पुन्हा अपयशी ठरला. रहाणेही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, परंतु ४८ धावांवर बाद झाला. पण प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यामते दुसऱ्या कसोटी सामन्यात असे होणार नाही.
दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाला, “जाहीर आहे की, आम्हाला मोठी धावसंख्या आवडते. नेहमी असे होत नाही की, चांगल्या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येत बदलता येईल. परंतु अनेकदा असे होते. राहुलने असे केले आहे. आशा आहे की, आमचे बाकीचे फलंदाजही असे करतील. आम्ही पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी चांगली फलंदाजी केली होती. मात्र, नंतर आम्ही मागे पडलो होतो. आम्हाला ही गोष्ट शिकावी लागेल, सुधारणा करावी लागेल. काही जागा आहेत, ज्याठिकाणी आम्हाला सुधारणा करायची आहे आणि आशा आहे की, दुसऱ्या सामन्यात ते करू.”
पुढे बोलताना द्रविड म्हणाला, “तुमच्या कारकिर्दीत अनेकदा असे होते की, तुम्ही चांगली फलंदाजी करत असता, पण मोठी धावसंख्या करता येत नाही. आमच्यासाठी हे दोन-तीन फलंदाजांसोबत एकत्र होत आहे, पण आशा आहे की, ते चांगली कामगिरी करतील. त्यांना माहिती आहे, चांगले प्रदर्शन कसे करायचे. मला आशा आहे की, ते पुढच्या सामन्यात असे करतील.”
पुजाराच्या फॉर्मविषयी बोलताना द्रविड म्हणाला की, “पुजाराविषयी चिंतित नाहीय. तो निश्चितच एक मोठी धावसंख्या करू इच्छितो. त्याने खूप यश मिळवले आहे आणि आधीही खूप धावा केल्या आहेत. ही चिंतेची गोष्ट नाहीय. मात्र, हा मुद्दा लक्ष देण्याचा आहे. कारण, तुमची इच्छा असते की, तुमचे सुरुवातीचे ४-५ फलंदाज मोठ्या धावसंख्या करतील. त्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्यांनी खूप साऱ्या धावा केल्या आहेत.”
महत्वाच्या बातम्या –
वॉर्नने क्रिकेटविश्व गाजवल खरं, मात्र पहिल्या सामन्यात शास्त्रींनी केलेली धुलाई तो विसरला नाही
व्हिडिओ पाहा –