भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांनी भारताला टी20 विश्वचषक जिंकून देऊन शेवट गोड केला. आता प्रश्न उभा राहतो, टीम इंडियाचं मुख्य प्रशिक्षकपद सांभाळल्यानंतर राहुल द्रविड पुढची जबाबदारी कोणती घेतील?
आयपीएल 2025 पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यापूर्वी अनेक फ्रँचाईजी आपल्या संघात मोठे बदल करू शकतात. अनेक संघांचे मुख्य प्रशिक्षकपद खाली होऊ शकतं. त्यामुळे राहुल द्रविड यांच्याकडे आयपीएलमधील एखाद्या संघाच्या हेड कोचची जबाबदारी सांभाळण्याची संधी आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे, असे सांगत राहुल द्रविड यांनी कार्यकाळ वाढवला नसला तरी आयपीएलसारख्या स्पर्धेत ते दोन-तीन महिन्यांत चांगला पगार मिळवू शकतात.
भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये जो आपला कार्यकाळ पूर्ण करतो, त्याला आयपीएलमध्ये सहज संधी मिळते. राहुल द्रविड यांनीही आपण आता बेरोजगार असल्याचं गमतीनं म्हटलं होतं. त्यामुळे आता आयपीएल 2025 पूर्वी 3 संघांचं लक्ष्य त्यांच्याकडे असू शकतं. द्रविड यांंना या 3 संघांच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी मिळू शकते.
(1) कोलकाता नाईट रायडर्स – सध्या गौतम गंभीर हा कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर आहे. मात्र तो भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार, हे जवळपास पक्क आहे. अशा परिस्थिती गंभीरला केकेआरमधील आपलं पद सोडावं लागेल. हे पद रिक्त झाल्यास संघाचा मालक शाहरुख खान राहुल द्रविडशी संपर्क साधून त्यांना मेंटॉरच्या भूमिकेसाठी विचारू शकतो.
(2) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली आणि राहुल द्रविड यांच्यात फार चांगलं नातं आहे. तसेच विराटच्या आरसीबीनं अद्याप आयपीएलचं विजेतेपद पटकावलेलं नाही. त्यामुळे नवीन हंगामापूर्वी संघ राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक पदासाठी विचार करू शकतो. तसेच राहुल द्रविड हे मूळचे बंगळुरूचे आहेत आणि ते आयपीएलमध्ये आरसीबीचे कर्णधार देखील राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी ही भूमिका स्वीकारण्यात फारसा त्रास होणार नाही.
(3) दिल्ली कॅपिटल्स – गेल्या काही हंगामांपासून दिल्ली कॅपिटल्सची आयपीएलमधील कामगिरी फारशी चमकदार राहिलेली नाही. त्यामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना आपलं पद सोडावं लागू शकतं. जर ते पद रिक्त झालं, तर दिल्ली फ्रँचायझी राहुल द्रविड यांच्याशी संपर्क साधू शकते. सध्या सौरव गांगुली हे दिल्ली कॅपिटल्सचे मेंटॉर आहेत. राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हे फार चांगले मित्र आहेत. त्यामुळे द्रविड यांना येथे काहीच अडचण येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
लागा तयारीला! या दिवशी टीम इंडिया भारतात पोहोचणार, बीसीसीआयनं केली खास विमानाची व्यवस्था
“फायनलमधील विराट कोहलीच्या खेळीनं भारताला अडचणीत आणलं होतं”, संजय मांजरेकर पुन्हा बरळले
प्रशिक्षक भावूक; टीम इंडियाला निरोप देण्यापूर्वी राहुल द्रविडने केले अंतिम भाषण