भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरची जोडी मैदानावर नेहेमीच वर्चस्व गाजवताना चहात्यांना पहायला मिळाली आहे. मैदानाबाहेरही हे दोघे चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते नेहेमीच एकमेकांविषयी आदराने बोलतात.
इएसपीएन क्रिकइन्फोला घेतलेल्या एका मुलाखतीत द्रविडला 25 रॅपिडफायर प्रश्न विचारण्यात आले होते. ज्यात द्रविडने सचिनबद्दल मोठे विधान केले आहे.
द्रविडला एक प्रश्न असा विचारण्यात आला की, तू आयुष्यासाठी कोणत्या फलंदाजाला निवडशील? यावर द्रविडने उत्तर दिले की ” सचिन तेंडूलकर हा माझा सर्वश्रेष्ठ सहकारी खेळाडू होता. त्याच्या क्षमता आणि गुणवत्तेमुळे मी त्याला निवडेल”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला द्रविड सध्या भारतीय अ संघाचे आणि 19 वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षकपद संभाळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–मला आॅलिंपिंक गोल्ड मेडल जिंकायला आवडलं असतं – राहुल द्रविड
–एमएस धोनी आणि धडक फेम इशान खट्टर झाले फुटबॉल सामन्यात सैराट
–बीसीसीआयचा हा पराक्रम युसूफ पठाणमुळे हुकला