---Advertisement---

बुमराहच्या वर्ल्डकप खेळण्याविषयी द्रविड यांनी दिले सर्वात महत्त्वाचे अपडेट; वाचा काय म्हणाले

On: शनिवार, ऑक्टोबर 1, 2022 6:57 PM
jasprit bumrah
---Advertisement---

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात सुरू होत असलेल्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे विश्वचषकात खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. पाठीच्या स्ट्रेच फ्रॅक्चरमुळे तो सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळेच त्याच्या विश्वचषक सहभागाविषयी साशंकता आहे. मात्र, दोन दिवस बुमराह विश्वचषकातून बाहेर होणार या चर्चेला ऊत आला असताना, बीसीसीआय अध्यक्ष  सौरव गांगुली यांनी तो विश्वचषकातून बाहेर झाला नाही असे वक्तव्य केले होते. आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी देखील त्यांचीच री ओढली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (2 ऑक्टोबर) गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल द्रविड यांना बुमराहच्या विश्वचषकात सहभागी होण्याविषयी विचारले गेले. त्यावर बोलताना द्रविड म्हणाले,

“सध्या तरी तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर आहे. तो विश्वचषकातून बाहेर गेला आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्टपणे सांगता येणार नाही. आम्ही आणखी काही दिवस वाट पाहत आहोत. लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येईल.”

जसप्रीत बुमराह जुलै महिन्यातील इंग्लंड दौऱ्यानंतर कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळला नव्हता. तो पाठीच्या दुखापतीतून सावरत असल्याने संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती दिली होती. टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सहभागी करून घेण्यात आले. तो मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना खेळला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत त्याचे खेळणे अपेक्षित होते. मात्र, पहिल्या सामन्यात त्याचे पाठीचे दुखणे पुन्हा एकदा उद्भवले. प्रथमदर्शनी तो पहिल्या सामन्यातून बाहेर झाला अशी माहिती देण्यात आली. परंतु, दुसऱ्या दिवशी त्याचे पाठीचे दुखणे गंभीर असल्याने तो संपूर्ण मालिकेत खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022: जेमीमाह रोड्रिगेझची ‘फिफ्टी’, भारताचे श्रीलंकेसमोर 151 धावांचे लक्ष्य
स्टेडियमबाहेर जमलेल्या गर्दीला पंतने केले खुश! दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---