भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने बुधवारी (29 नोव्हेंबर) मोठी घोषणा केली. राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. अशात राहुल द्रविड पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासोबत असू शकतो. पण याबाबत आता स्वतः द्रविडकडून मोठी माहिती समोर आली आहे.
बुधवारी बीसीसीआयने राहुल द्रविड आणि भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ वाढवला. पण द्रविडने स्वतः अशी माहिती दिली की, अद्याप त्याने बीसीसीआयच्या करारावर स्वाक्षरी केली नाहीये. गुरुवारी (30 नोव्हेंबर) दिल्लीमध्ये संघाची विश्वचषक आढावा बैठक झाली. द्रविड देखील या बैठकीसाठी उपस्थित होता. बैठक आटोपल्यानंतर द्रविड म्हणाला, “मी अजून तरी बीसीसीआयच्या करारावर सही केली नाहीये. पण कार्यकाळाबाबत चर्चा झाली आहे. एकदा मला कागदपत्रे मिळाली, तर मी स्वाक्षरी करेल.”
दरम्यान, वनडे विश्वचषक 2023 संपल्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे आणि आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचाही कार्यकाळ संपला. टी-20 विश्वचषक 2021 संपल्यानंतर प्रशिक्षकांची ही नवी फळी बीसीसीआयने नियुक्त केली होती. दोन वर्ष संघासोबत काम केल्यानंतर वनडे विश्वचषक 2023 हे या प्रशिक्षाकांसाठी शेवटचे अभियान होते. पण बीसीसीआयने आता या चारही प्रशिक्षकांना पुन्हा एकदा करारबद्द केले आहे.
सध्या भारतीय संघ मायेदशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. पाच सामन्यांची ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ टी-20, वनडे आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या मालिकेत 10 डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या या दौऱ्यात राहुल द्रविड संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मात्र द्रविड मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत नव्हता. या मालिकेसाठी मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी एनसीए प्रमुख वीवीएल लक्ष्मण याने सांभाळली.
महत्वाच्या बातम्या –
राहुलच्या नेतृत्वात तयार होणार नवा वनडे संघ! बीसीसीआयने आखली भविष्याची योजना, युवा खेळाडूंवर दाखवला विश्वास
BREAKING: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टी20 संघात नवे छावे! रोहित-विराटला विश्रांती, पाहा संपूर्ण टीम