Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहित आणि विराटची टी-20 कारकीर्द समाप्त? मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडून मिळाले संकेत

रोहित आणि विराटची टी-20 कारकीर्द समाप्त? मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडून मिळाले संकेत

January 6, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rahul-Dravid

Photo Courtesy: Twitter/BCCI


श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ 16 धावांच्या अंतराने पराभूत झाला. उभय संघांतील हा सामना पुण्याच्या एमसीएस स्टेडियवर खेळला गेला, ज्यात हार्दिक पंड्या भारताचे नेतृत्व करत होता. नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे या संघातून बाहे आहे, तर विराट कोहली याला विश्रांती दिली गेली आहे. दुसऱ्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी माथ्यमांना खास प्रतिक्रिया दिली.

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या भारताचे नेतृत्व करत असला, तरी हार्दिकला भारताचा भविष्यातील टी-20 कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid ) यांनी देखील आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे संकेत दिले आहेत. यावर्षी भारतात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार असून टी-20 विश्वचषक 2024 साली म्हणजेच पुढच्या वर्षी खेळला जाणार आहे. पुढच्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापन भारताचा टी-20 संघ तयार करत असल्याचे दिसू लागले आहेत. या टी-20 संघात युवा खेळाडूंना प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत द्रविडने दिले आहेत. द्रविडने यावेळी बोलताना रोहित आणि विराटने नाव घेतले नाही, पण भविष्यात त्यांना टी-20 फॉरमॅटमध्ये विश्रांती मिळणार असल्याते संकेत मात्र त्यांच्याकडून मिळाले.

श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी (5 जानेवारी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारत पराभूत झाला. पराभवानंतर माध्यमांशी बोलताना द्रविड म्हणाले की, “इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामना खेळणाऱ्या संघापैकी फक्त तीन-चार खेळाडू या संघात आहेत. आम्ही थोड्या वेगळ्या परिस्थितीत आहोत कारण आम्ही आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने तयारी करत आहोत. श्रीलंकेविरुद्ध या युवा संघाला खेळवणे एक चांगला अनुभव आहे. ही चांगली गोष्ट आहे. जास्त लक्ष्य वनडे विश्वचषक आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये आम्ही खेळाडूंना आजमावत आहोत.”

भारतीय संघाचा यावा वेगवान वोगवान गोलंदाज अर्शदीप सिंग गुरुवारी संघासाठी चांगलाच महागात पडला. अर्शदीपने या सामन्यात पाच नो बॉल टाकले असून काही नकोशे विक्रम देखील नावावर केले. अर्शदीपच्या प्रदर्शनावर बोलताना द्रविड म्हणाले की, “नो बॉल टाकण्याची इच्छा कोणाचीच नसते. टी-20 फॉरमॅटमध्ये ही गोष्ट त्रासदायक असते. आपण या युवा खेळाडूंसोबत थोडा संयम बाळगला पाहिजे. आपल्या संघात युवा खेळाडू आहेत, खासकरून गोलंदाज युवा आहेत. तर काही सामन्यांमध्ये असं होऊ शकतं.”

दरम्यान, मागच्या वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाला होता. उभय संघांतील या सामन्यात बारताला 10 विकेट्सच्या अंतराने पराभव स्वीकारावा  लागला. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यातील सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग या चौघांव्यतिरिक्त एकही खेळाडू श्रीलंकेविरुद्ध खेळत नाहीये.  (Rahul Dravid has hinted that Virat Kohli and Rohit Sharma’s T20 career is over)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जय शाहवर भडकले पीसीबीचे अध्यक्ष! म्हणाले, ‘आशिया चषकाचे सांगितले आता आमच्या पीएसएलच्या…’
भारताच्या पराभवास हार्दिक कारणीभूत! ‘हे’ तीन निर्णय विचारपूर्वक घेतले असते, तर जिंकला असता संघ


Next Post
Team India & AUSvSA

AUSvSA: भारताचे टेंशन वाढले! सिडनी कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या खेळावर पावसाने फेरले पाणी

Hardik-Pandya

'नो- बॉल हा गुन्हाच...', टीम इंडियाने दुसरा टी20 गमावताच हार्दिक पंड्याचे मोठे भाष्य

Hardik Pandya

INDvSL: सामना संपण्याआधीच हार्दिकने मानली होती हार, आता होतोय ट्रोल

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143