---Advertisement---

INDvWI: ‘गुरु’ द्रविड यांचा मास्टर स्ट्रोक! नेटमध्ये चक्क लोकल गोलंदाजाकडून करून घेतली गोलंदाजी

On: शुक्रवार, जुलै 22, 2022 3:14 PM
IND net practice session
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) यांच्यात शुक्रवारी (२२ जुलै) मालिकेतील पहिला वनडे सामना खेळला जाणार आहे. हा सामना त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रिषभ पंत या खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ या मालिकेत प्रवेश करेल. दोन्ही संघ या सामन्यासाठी तयार आहेत.भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्याने तो पहिल्या सामन्यातून बाहेर झाला असून मालिकेतही खेळणार की नाही याबाबत शंका आहे. यामुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड  (Rahul Dravid)यांनी त्वरीत एक निर्णय घेतला आहे.

मालिकेला सुरूवात झाली नसता भारतासाठी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची दुखापत हा मोठा झटका ठरला आहे. तसेच जडेजा हा या मालिकेत भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. त्याने दुखापतीमुळे नेटमध्ये सरावही केला नाही. यामुळे द्रविड यांनी सरावामध्ये ताबडतोब एक उपाय शोधला आहे. त्यांनी डाव्या हाताच्या युवा फिरकीपटूला सरावासाठी बोलावून घेतले. या स्थानिक गोलंदाजाकरवी भारतीय फलंदाजांनी अर्धा तास सराव केला.

भारताचा डाव्या हाताचा फिरकीपटू जडेजा जखमी असल्याने द्रविड यांनी ही युक्ती लढवली आहे. वेस्ट इंडिज संघात अकील हुसैन आणि गुडाकेश मोटी हे फिरकीपटू असून ते भारतीय फलंदाजांना त्रासदायक ठरू शकतात. मागे जेव्हा भारत-वेस्ट इंडिज समोरासमोर आले होते तेव्हा अकील हुसैन याने टी२०मध्ये ५.६७च्या सरासरीने २ विकेट्स घेतल्या होत्या. त्या मालिकेत त्याने एकच चौकार दिला होता, तर एकाही फलंदाजाला त्याच्या विरुद्ध एकही षटकार मारता आला नाही.

द्रविड याने ज्या फिरकीपटूकडून नेटमध्ये गोलंदाजी करून घेतली त्याचे नाव आमीर अली असे आहे. या खेळाडूच्या विरोधात सलामीवीर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी नेटमध्ये चागंलाच घाम गाळला आहे.

भारतीय फलंदाजांना केलेल्या गोलंदाजीनंतर अली म्हणाला, “आंतरराष्ट्रीय फलंदाजांला गोलंदाजी करण्याचा अनुभव उत्तम राहिला आहे. या दरम्यान द्रविड यांनी मला काही महत्वाच्या सुचनाही दिल्या आहेत.”

अली हा अनकॅप्ट्ड खेळाडू आहेत. तसेच या मालिकेत भारत शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तीन सामन्यांची ही वनडे मालिका जिंकण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे. या मालिकेत भारतीय संघात युवा खेळाडूंचा अधिक भरणा असल्याने यजमान संघ अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी नुकतेच घरच्या मैदानावर बांगलादेश विरुद्ध वनडे मालिका ३-० अशी गमावली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

WIvsIND | पहिल्या वनडे सामन्यात पाऊस राज्य करणार? पहा हवामान आणि पिच रिपोर्ट

‘जशी संघाची बेंच स्ट्रेंथ महत्वाची आहे, तशीच प्रशिक्षकांची…’, एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मोठे विधान

VIDEO | एक टप्पा आउट! कुटुंबातील लहान सदस्यांना शेवटपर्यंत नाही बाद झाला मोहम्मद कैफ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---