---Advertisement---

WIvsIND | पहिल्या वनडे सामन्यात पाऊस राज्य करणार? पहा हवामान आणि पिच रिपोर्ट

On: शुक्रवार, जुलै 22, 2022 1:21 PM
---Advertisement---

भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी (२२ जुलै) खेळला जाणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धचा हा पहिला सामना त्रिनिदादच्या क्विन्स पार्क ओव्हलवर खेळला जाणार आहे. यावेळी भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या मालिकेत नियमीत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली आहे.

या मैदानावर तीन वर्षानंतर वनडे सामना खेळला जात आहे. अशातच भारतीय संघाने पावसामुळे इनडोयर सराव केल्याने सामन्यावेळी हवामान आणि खेळपट्टी कशी असेल याची माहिती घेऊया.

एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, त्रिनिदादमध्ये शुक्रवारी काही वेळ वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यातच जर पाऊस पडला तर सामन्यावर याचा काही परिणाम होणार नाही. कारण पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी आहे. तर तापमान ३५ डिग्री सेल्सियसच्या आसपास असणार आहे.

या खेळपट्टीवर चेंडू चांगला उसळी घेतो. सामना जसजसा पुढे जातो स्पिनर्सला ही खेळपट्टी पुरक ठरत जाते. या मैदानावर सरासरी २७०-२८० धावासंख्या होते. भारताने या मैदानावर मागील झालेल्या सामन्यांतील ९ पैकी ८ सामने जिंकले आहेत. तर एक सामना पावसामुळे वाया गेला होता.

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने मर्यादीत षटकांच्या दोन्ही मालिका २-१ने जिंकल्या आहेत. सामने जिंकण्यामध्ये असेच सातत्य राखण्याचा भारत प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिज संघाला नुकतेच घरच्या मैदानावर बांगलादेशकडून वनडे मालिकेत पराभूत व्हावे लागले आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत बांगलादेशने वेस्ट इंडिजला ३-०ने पराभूत केले होते. यातच शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नेतृत्वाखाली या भारतीय संघामध्ये युवा खेळाडूंचा भर असल्याने पाहुणा संघ यजमान संघावर वरचढ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल, तर सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी ६.३० वाजता होईल. भारतामध्ये याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्टवर होणार आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी घेतला थेट निर्णय, ‘आता आशिया चषक…..’

‘भारतीय संघ युवा असेल तरी….’ वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यापूर्वीच कर्णधार शिखर धवनने दिला कानमंत्र

INDvWI। भारताचा वेस्टइंडिज दौरा कधी अन् कुठे दिसणार?, वाचा सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---