‘मिस्टर कूल’ आणि ‘द वॉल’ यासारख्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं टी20 विश्वचषक जिंकला. 2021 मध्ये संघाची धुरा सांभाळणाऱ्या द्रविड यांच्या कार्यकाळात भारतीय संघानं भरपूर यश संपादन केलं आहे. राहुल द्रविड हे अतिशय शांत आणि सरळ स्वभावाचे व्यक्ती आहेत. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, तरुण वयात द्रविड यांनाही आपल्या हृदयावर ताबा ठेवता आला नाही!
राहुल द्रविड यांनी जेव्हापासून टीम इंडियासाठी खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून त्यांच्या लूकची खूपच चर्चा होती. ते भारतीय संघाचे पोस्टर बॉय होते. मात्र बंगळुरूच्या या तरुणाचं मन जिंकलं एका मराठमोळ्या मुलीनं! होय, राहुल द्रविड यांची पत्नी महाराष्ट्रीयन आहे. त्यांचं नाव विजेता पेंढारकर असून त्या नागपूरच्या आहेत. राहुल द्रविड आणि विजेता पेंढारकर 2003 मध्ये विवाहबद्ध झाले होते. त्यापूर्वी दोघेही अनेक महिने एकमेकांना डेट करत होते.
विजेता पेंढारकर यांचे वडील हवाई दलात होते. त्यांची बंगलोर (आताचं बंगळुरू) येथे बदली झाली होती. तेथे बदली झाल्यानंतर दोन्ही कुटुंबात मैत्री निर्माण झाली. अशाप्रकारे विजेता आणि राहुल यांची भेट झाली. भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. इथून प्रेमकहाणी सुरू झाली. यानंतर विजेता यांचं कुटुंब नागपुरात स्थलांतरित झालं, त्यानंतरही त्यांचे संबंध कायम राहिले.
दरम्यानच्या काळात राहुल द्रविड यांनी क्रिकेटपटू म्हणून मोठं नाव कमावलं. मात्र त्यामुळे त्यांना कुटुंबाला जास्त वेळ देता येत नव्हता. विजेता पेंढारकर या व्यवसायानं डॉक्टर (सर्जन) आहेत. दोघांचं लग्न होऊन त्यांना पहिला मुलगा झाल्यानंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढल्या. अशा परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी विजेता यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सोडला. तेव्हापासून त्या गृहिणी म्हणून द्रविड कुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जय शाह यांचं मोठं मन! बार्बाडोसमध्ये अडकलेल्या भारतीय पत्रकारांसाठी केला मदतीचा हात पुढे
ट्राॅफीची प्रतिक्षा संपली! 17 वर्षांनंतर मुंबईकर होणार ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार
“मरणाच्या दारापासून ते टी20 विश्वचषक विजेता”, पाहा रिषभ पंतचा प्रेरणादायी प्रवास