---Advertisement---

द्रविड बनू शकतो टीम इंडियाचा प्रशिक्षक, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले संकेत

On: बुधवार, सप्टेंबर 15, 2021 4:34 PM
---Advertisement---

युएई आणि ओमानमध्ये येत्या १७ ऑक्टोबर पासून आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे नवीन मुख्य प्रशिक्षक कोण असणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी असे काही संकेत दिले आहेत, ज्यावरून अंदाज व्यक्त केला जात आहे की, राहुल द्रविड हे पुढील मुख्य प्रशिक्षक असतील.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेवरुन संकेत दिले आहेत की, राहुल द्रविडला भारतीय संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते.

त्यांनी टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मला समजलं आहे की, राहुल द्रविडला कायमस्वरूपी प्रशिक्षक होण्यात रस नाही. त्यामुळे, काही वेळासाठी मुख्य प्रशिक्षक पद देण्याचा विचार केला जाऊ शकतो. परंतु, याबाबत कुठलीही चर्चा झाली नाहीये. वेळ आल्यावर योग्य निर्णय घेतला जाईल.”

राहुल द्रविडने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, त्याला भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडण्यात रस नाही. दरम्यान, रवी शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कालावधी देखील टी -२० विश्वचषक स्पर्धेनंतर पूर्ण होणार आहे. तसेच रवी शास्त्री देखील ही जबाबदारी पुन्हा एकदा स्विकारणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, बीसीसीआय ही जबाबदारी कोणाकडे सोपवणार.

राहुल द्रविड सध्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये मुख्य पदावर आहेत. जेव्हा खेळाडू दुखापतग्रस्त होत असतात, त्यावेळी त्यांना फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये पाठवले जाते. अनेक युवा खेळाडूंना घडवण्यात देखील राहुल द्रविड यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी राहुल द्रविड यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडली होती. (Rahul Dravid may appointed head coach of Indian team)

तसेच राहुल द्रविड यांनी १९ वर्षाखालील भारतीय संघ आणि इंडिया अ संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे, राहुल द्रविडच पुढील मुख्य प्रशिक्षक असावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, राहुल द्रविड यांनी दीर्घ काळ ही जबाबदारी पार पाडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना काही वेळासाठी मुख्य प्रशिक्षक पद देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे सौरव गांगुली यांचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘त्याने क्षणातच होकार दिला’, उथप्पाने सांगितला धोनी सोबतचा २००७ टी २० विश्वचषकातील खास किस्सा

सूर्यकुमारच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वी शॉ आणि इरफान पठाणने शेअर केलेले फोटो पाहून पोटधरून हसाल

सीपीएल स्पर्धा गाजवल्यानंतर विराटचा ‘हा’ भिडू आयपीएल गाजवण्यास सज्ज, पाहा कशी राहिली आहे कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---