भारतीय संघानं राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली 2024 टी20 विश्वचषक जिंकला. त्याआधी टीम इंडियानं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली 2023 एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. टीम इंडियानं टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला, ज्यानंतर गौतम गंभीर याला ही जबाबदारी देण्यात आली. परंतु आता राहुल द्रविडचा भारतीय खेळाडूंसोबत एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला.
वास्तविक, व्हिडीओमध्ये दिसत आहे की राहुल द्रविड अचानक टीम इंडियाच्या खेळाडूंना भेटायला पोहोचतात. ते रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्याशी बराच वेळ बोलतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागला की, राहुल द्रविड पुन्हा एकदा टीम इंडियात परतणार का? तर आम्ही तुम्हाला सांगतो, असं अजिबात नाही. द्रविडच्या टीम इंडियात पुनरागमन करण्याबाबत सध्या कोणत्याही प्रकारची बातमी नाही.
भारतीय संघ सध्या बंगळुरूमध्ये आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. या मालिकेतील पहिली कसोटी बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळली जाणार आहे. पहिल्या कसोटीसाठी सुरू असलेल्या सरावादरम्यान द्रविडनं टीम इंडियाच्या खेळाडूंची भेट घेतली. हा व्हिडिओ त्यावेळेसचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Captain Rohit, Kohli & Pant with Rahul Dravid at Bengaluru ❤️
– The best combo….!!!! pic.twitter.com/4gcRw7qymV
— Johns. (@CricCrazyJohns) October 13, 2024
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर दोन्ही संघ दुसऱ्या कसोटीसाठी पुण्यात पोहोचतील. तेथे 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान सामना खेळला जाईल. त्यानंतर मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळली जाईल.
हेही वाचा –
कर्णधारच आहे भारताच्या पराभवाचं कारण, ही चुकी पडली महागात
वर्ल्डकप विजेत्या खेळीपासून मुख्य प्रशिक्षक बनण्यापर्यंत, गौतम गंभीरचं भारतीय क्रिकेटमधील योगदान
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी संघाला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर