भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात झालेल्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेदरम्यान रिषभ पंत खूप चर्चेत राहिला. पूर्ण मालिकेदरम्यान पंतला त्याचे नेतृत्त्व आणि फलंदाजी, दोन्हीसाठी ट्रोल करण्यात आले. अखेर पाचवा सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने ही मालिका २-२ने बरोबरीत सुटली. या मालिकेनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मात्र पंतचा बचाव केला आहे.
पंत (Rishabh Pant) पहिल्यांदाच भारतीय संघाचा कर्णधार बनला होता आणि सुरुवातीचे २ सामने गमावल्यानंतर त्याने पुनरागमन करणे मोठी गोष्ट असल्याचे द्रविड (Coach Rahul Dravid) यांनी म्हटले आहे. तसेच पंत युवा कर्णधार आहे आणि तो शिकत आहे. वेळेनुसार तो परिपक्व बनत जाईल, असे म्हणते द्रविड यांनी पंतची (Rahul Dravid On Rishabh Pant) पाठराखण केली आहे.
दोन सामने गमावून पुनरागमन करणे मोठी गोष्ट
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील पाचवा आणि शेवटचा टी२० सामना झाल्यानंतर प्रशिक्षक द्रविड बोलत होते. ते म्हणाले की, “सुरुवातीचे २ सामने गमावल्यानंतर पुढचे २ सामने जिंकणे आणि मालिका २-२ ने बरोबरीत आणून विजयाची चांगली संधी उपलब्ध करून देणे प्रभावी होते. नेतृत्त्वपद हे जय किंवा पराजयाबद्दल नसते. तो एक युवा कर्णधार आणि शिकत आहे. आताच त्याच्याबद्दल कोणते वक्तव्य करणे घाई होईल. फक्त एका मालिकेवरून त्याच्यातील क्षमतेबद्दल बोलणे चुकीचे ठरेल. त्याला यष्टीरक्षण, फलंदाजी आणि नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली, ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यावर खूप दबाव आहे, परंतु तो यातून शिकत आहे. भारतीय संघाला ०-२ वरून २-२ वर आणण्याचे श्रेय त्याला जाते.”
अचानकच पंतवर टाकला गेला नेतृत्त्वाचा भार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला निवडले गेले नव्हते. त्यामुळे त्याच्याजागी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याची निवड केली गेली होती. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी२० मालिका सुरू होण्यापूर्वीच त्याला दुखापत झाली आणि तो मालिकेतून बाहेर झाला. अशात पंतच्या खांद्यावर ही जबाबदारी आली. अचानक भारतीय संघाचे नेतृत्त्वपद सोपवले गेलेला पंत पहिल्या २ सामन्यात संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. परंतु पुढे दमदार पुनरागमन करत त्याने संघाला पुढील दोन्हीही सामने जिंकून दिले. मात्र पाचव्या टी२० सामन्यावर पावसाचे पाणी फेरल्याने ही मालिका २-२ ने बरोबरीत सुटली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी२०चा दांडगा अनुभव अन् दमदार फॉर्म असूनही ‘या’ खेळाडूला टी२० विश्वचषकात नाही मिळणार जागा