भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड देखील क्रिकेटपटू आहे. रविवारी (18 ऑगस्ट) बेंगळुरू येथे महाराजा ट्रॉफी स्पर्धेत त्यानं आपल्या फलंदाजीनं कहर केला.
स्पर्धेचा सातवा सामना गुलबर्गा मिस्टिक्स विरुद्ध म्हैसूर वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात म्हैसूरकडून फलंदाजी करताना समितनं दाखवून दिलं की तो एका महान फलंदाजाचा मुलगा आहे. पहिल्या सामन्यात केवळ 7 धावा करून बाद झालेल्या समितनं दुसऱ्या सामन्यात खळबळ उडवून दिली.
एके काळी वॉरियर्स संघ संघर्ष करत होता. त्यांनी चौथ्या षटकात 18 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. येथून समित आणि करुण नायरनं फटकेबाजी करत संघाला संकटातून बाहेर काढलं. समितनं 24 चेंडूत एक षटकार आणि चार चौकारांच्या मदतीनं 33 धावा केल्या. त्यानं करुण नायरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. करुण नायरनं 35 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीनं 66 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचा माजी अष्टपैलू खेळाडू जगदीश सुचितनं 13 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं 40 धावांची खेळी केली. यामुळे वॉरियर्सनं प्रथम फलंदाजी करताना 8 गड्यांच्या मोबदल्यात 196 धावा केल्या.
समित द्रविडच्या खेळीतील एक षटकार सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. समितनं 10व्या षटकात गुलबर्गा मिस्टिक्सचा लेगस्पिनर प्रवीण दुबेच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला. प्रवीणनं ऑफ स्टंपवर गुगली टाकली होती. मात्र समितनं वडील राहुल द्रविड प्रमाणे हा चेंडू ओळखून डीप कव्हर एरियामध्ये इनसाईड-आउट सिक्स हाणला. समितनं आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 137 एवढा होता. तुम्ही त्याच्या षटकाराचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
ಹೋಗಿ.. ಅವರ ಮಗ ಬಂದಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳು..🫡💥
ಸಮಿತ್ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ನೋಡ್ತಾಯಿದ್ರೆ, ಒಂದು ಕ್ಷಣ ದ್ರಾವಿಡ್ ಸರ್ ಏ.. ಜ್ಞಾಪಕ ಬರ್ತಾರೆ..❤️😍
📺 ನೋಡಿರಿ Maharaja Trophy KSCA T20 | ಗುಲ್ಬರ್ಗ vs ಮೈಸೂರು | LIVE NOW #StarSportsKannada ದಲ್ಲಿ#MaharajaTrophyOnStar @maharaja_t20 pic.twitter.com/MO1SgEGkE7
— Star Sports Kannada (@StarSportsKan) August 18, 2024
हेही वाचा –
16 वर्षांच्या चमकदार कारकिर्दीतील विराट कोहलीचे 5 मोठे विक्रम, अनेक दिग्गजांना सोडलं मागे
भारतीय खेळाडूमध्ये दिसला धोनीचा अवतार! अखेरच्या ओव्हरमध्ये षटकार ठोकून बनवलं टीमला चॅम्पियन
काय सांगता! तब्बल 11 खेळाडू शून्यावर बाद, तरीही हा विश्वविक्रम कायमच!